धानावरील किडींचे व्यवस्थापन

0

धानावरील किडींचे व्यवस्थापन

१) खोडकिडा

खोडकिड्याच्या नियंत्रणाकरिता 
१) खोडकिडा प्रतिकारक धानाच्या जातींची उदा. साकोली-८५ लागवड करावी. २) रोवणीपूर्वी रोपाची मुळे क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही १० मि.ली प्रति १० लिटर पा तयार केलेल्या मिश्रणात १२ तास बुडवून ठेवावीत व नंतर रोवणी करावी. ३) धानाची कापणी जमिनीलगत धान कापणीनंतर वापसा असताना नांगरणी करून धसकटे गोळा करावीत व जाळावीत. ५) शेतात ५ टक्के स्तिपु दिसताच क्विनॉलफॉस ३२ मि.ली. किंवा ट्रायझोफॉस २५ मि.ली. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारावे ट्रायकोग्रामा जॅपोनिकम हे परोपजीवी कीटक हेक्टरी ५०,००० या प्रमाणात दर ७ दिवसाचे अंतराने ३ ते ४ वेळा सो
 २) गादमाशी : १) प्रतिकारक जातींची उदा सिंदेवाही- २००१ साकोली ८. व पी. के. व्ही. गणेशची लागवड करावी. ३) सभोवतील पूरक वनस्पतीचा (देवधान) नाश करावा. ३) किडग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत. ४) गादमाशी प्रवण रोवणीनंतर १० आणि ३० दिवसांनी तर इतर क्षेत्रात ५ टक्के चंदेरी पोंगे इतका प्रादुर्भाव आढळताच दाणेदार फोरेट १० १० किलो अथवा दाणेदार क्विनॉलफॉस ५ टक्के ५ किलो प्रति हेक्टरी बांधीमध्ये ७ ते १० सें.मी. (३ ते ४ इंच) असताना टाकावे बांधीतील पाणी चार दिवसपर्यंत बांधीबाहेर काढू नये अथवा गराडीची पाने १.५० टन प्रति हेक्टर याप्रमाणात चिखलणीचे वेळी शेतात टाकावीत, यामुळे तुडतुडे आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव सुध्दा कमी होतो. ५) गादमाशी प्रवण क्षेत्रामध्ये धानावरील गादमाशीचा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता शिफारसीत तारखेच्या १५ दिवस लवकर रोवणी (२ ते २० जुलै दरम्यान) करण्यात यावी.
३) तुडतुडे :

 १) तपकिरी तुडतुड्याना प्रतिकारक जातींची लागवड करावी. उदा. पिकेव्ही गणेश, सिंदेवाही- २००१ २) चिखलणीच्या वेळी बांधीत गराडीचे १५० टन प्रति हेक्टरी या प्रमाणात मिसळावी त्यामुळे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव क होतो. ३) रोपाची लावणी शिफारसीत अंतरावर (२०x१५ किंवा २०x२० सें.मी.) ४) पट्टा पध्दतीने लागवड करावी म्हणजेच १० ओळी किंवा २ मिटर नंतर ३० सें. मी. अंतर सोडावे. ५) रोपे अतिशय दाट लावू नये, जास्त दाट लागवड झाल्यास तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. ६) पिकामध्ये मित्र किटकांच्या संवर्धनासाठी धान बांधावर सेंद्र चवळी पिकाची लागवड करावी. ७) वाजवीपेक्षा नत्र खताचा वापर करू नये. ८) टेहाळणीसाठी प्रकाश सापळ्यांचा चा करावा. ९) तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्यास बाधीतील पाणी सोयीनुसार ३ ते ४ दिवसासाठी बाहेर सोडावे. १०) तुडतुड्यांचा प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी मेटॅरायझीयम अनिसोप्ली १.१५ टक्के भुकटी (1X10 CFUigm mini) Acc No. MTCC-5173) या जैविक बुरशीचा २.५ कि./हे. या प्रमाणात बांधीमध्ये वापर करावा ११) रासायनिक किटकनाशकाची अनावश्यक फवारणी टाळून भक्षक व इतर परोपजीवी किटकांचे संवर्धन व संरक्षण करावे. १२) तुडतुड्याची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच नियंत्रणासाठी बुप्रोफेजीन २५ टक्के प्रवाही १६ मि.ली. किंवा मिक्लोप्रिड १०.८ एस. एल. मि.ली. किंवा फिप्रोनिल ५ एस.सी. २० मि.ली. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही १२.५० मि.ली. किंवा इथोनॉक्स १० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा फ्लोनिकमोड ५० टक्के ३ ग्रॅम किंवा थायोमीथाझ्यांम २५ प्रति १० लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

 ४) लष्करी अळी

 : लष्करी अळी धान पिकाचे रोपवाटीका, रोवणी नंतर व पीक पक्वते वेळी नुकसान करतात. कमी प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास अळ्या दिवसा झाडाचे बुंध्यात, ढेकळाखाली, दगडाखाली, बांधीत पाणी नसतांना ढिगाऱ्याखाली लपून राहतात आणि रात्री पिकाचे नुकसान करतात. जंगल क्षेत्र तसेच पाटाचे बांध इत्यादीवर या किडीचे प्रजनन होऊन लगतच्या धान रोपवाटीका, लागवड (रोपणी) क्षेत्र अथवा पीक पक्वते वेळी अळ्या लोंब्या कुरतडून शेतात लोब्यांचा सडा पाडतात. या किडीच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेत अथवा धान बांधीत पाणी साठविणे, बांध साफ करणे. किडीची कोषावस्था नष्ट करण्यासाठी भाताची कापणी झाल्यावर खोलवर नांगरणी करून धसकटे जाळून नष्ट करावी. पिकावरून दोर किंवा झाडाच्या फांद्या आडव्या फिरवून लष्करी अळ्या पाडाव्यात. तसेच बेडकांचे संवर्धन करावे कारण बेडूक अळ्या खातात. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी डाक्लोरव्हास ७६ ई.सी. १२.५० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५) पाने गुंडाळणारी अळी

पाने गुंडाळणारी अळी, बेरड, सुरळीतील अळी व शिंगे अळी यांच्या नियंत्रणासाठी बिव्हेरीया बॅसियाना १.१५ टक्के २.५ कि./हे. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही २५ मि.ली. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही २५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »