सीताफळ लागवड तंत्रज्ञान

0

सीताफळ लागवड तंत्रज्ञान 

जमीन : वाळूयुक्त, खडकाळ, लाल, आणि गाळाची जमीन सिताफळ लागवडीस योग्य. जमिनीचा सामू ८.५ ते ९.० पर्यंत असणाऱ्या जमिनीसुध्दा लागवडीस योग्य ठरु शकतात, 
जाती : बालानगर, अर्का सहान, फुले पुरंदर
 अभिवृध्दी : मृदकाष्ठ पध्दतीने किंवा बियाव्दारे. 
अंतर : ४ x ४ मीटर (हेक्टरी ६२५ झाडे) हलक्या जमिनीकरिता खड्डा ६० x ६० x ६० सें.मी. (५ x ५ मीटर मध्यम जमिनीकरिता )
लागवड : मे महिन्यात खड्डे खोदून ते चांगल्या गाळाच्या मातीने, खत व रेती मिश्रणाने भरुन पावसाळ्यात जून-ऑगष्ट पर्यंत लागवड करावी. वळण एका खोडावर वाढवावे.
आंतरपिके  : लागवडीनंतर पहिले दोन वर्षे कमी कालावधीची भाजीपाला पिके, हिरवळीची किंवा कडधान्याची पिके घ्यावी.. वेलवर्गीय भाजीपाला पिके तसेच ज्वारी, मक्यासारखी पिके टाळावी.
बहार : जून ते जुलै मध्ये फुलोरा येतो. तोडणीचा हंगाम : ऑक्टोबर – डिसेंबर पर्यंत चालतो. 
उत्पादन: ५५ ते ६० फळे प्रति झाड (५ वर्षे वयापासून पुढे) किंवा ६ ते ७ किलो प्रति झाड 
आर्थिक आयुष्य : १५ ते २० वर्षे.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »