फुलकोबी लागवड व तंत्रज्ञान

0

फुलकोबी लागवड व तंत्रज्ञान 

जमीन : मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
लागवडीची वेळ
अ) लवकर येणाऱ्या :सप्टेंबर – ऑक्टोबर
ब) मध्यम येणाऱ्या : जून-जुलै-ऑगस्ट
क) उशिरा येणाऱ्या :एप्रिल- मे
हेक्टरी बियाणे : ६०० ते ७५० ग्रॅम पूर्वमशागत : शेतास आडवी उभी नांगरणी दिल्यावर ढेकळे फोडून घ्यावीत. वखराची एक पाळी देऊन जमिनीत चांगले कुजलेले शेणखत ४०-५० गाड्या हेक्टरी मिसळावे. नंतर पुन्हा वखराची एक पाळी द्यावी. सुधारित जाती :
(अ) लवकर येणाऱ्या जाती : पुसा कातकी, पुसा दिपाली, अर्लीीं कुंवारी, अर्ली पटना. ब) मध्यम काळात येणाऱ्या जाती : सुधारित जपानी, आघानी, पुसा सिंथेटीक, पुसा शुभ्रा क) उशिरा येणाऱ्या जाती : स्नो बॉल १६, स्नो बॉल-१ व सिओ-९
रोपे तयार करणे व लागवड : हेक्टरी ६०० ते ७५० ग्रॅम चांगल्या प्रतिचे बियाणे विकत घेऊन लवकर येणाऱ्या जातीचे बियाणे मे-जून, मध्यम येणाऱ्या जातीचे बियाणे जून -ऑगस्ट आणि उशिरा येणाऱ्या जातीचे बियाणे सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये गादी वाफ्यावर पेरून रोप तयार करावे. रोपे १० ते १२ सें.मी. उंचीचे झाल्यानंतर किंवा रोपे ४ ते ६ आठवड्याचे झाल्यावर लागवडीस वापरावे. लवकर येणाऱ्या जाती ४५ x ४५ सें.मी., मध्यम व उशिरा येणाऱ्या जाती ६० x ४५ सें.मी.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »