Rain Update : वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, सहा जनावरे दगावली

0

Rain Update : वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, सहा जनावरे दगावली

Monsoon Update : मराठवाड्याच्या विविध भागात रविवारी (ता. ४) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू तर सहा जनावरे दगावली आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्याच्या विविध भागात रविवारी (ता. ४) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू तर सहा जनावरे दगावली आहेत. छत्रपती संभाजीनगरसह सोयगाव, वैजापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद, गंगापूरमध्ये वाऱ्याचा तडका बसला. अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली. वीज खांब कोसळले. काही ठिकाणी विवाह समारंभात वऱ्हाडी मंडळींची तारांबळ उडाली.
लिंबे जळगाव जवळील तुर्काबाद खराडी येथे काका पुतण्यावर वीज पडली. यात शेतकरी चुलत्याच्या जागीच मृत्यू तर पुतण्या गंभीर जखमी झाला. कृष्णा रामदास मेटे असे मृताचे नाव आहे निलेश मेटे असे जखमी पुतण्याचे नाव आहे. बीड जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह वीज पडण्याच्या घटना घडल्या. वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भारत गणपती मुंडे राहणार आंबलटेक ता अंबाजोगाई असे त्याचे नाव आहे.
जिल्ह्यात तीन जनावरे दगावली. आष्टी तालुक्यात वादळामुळे काही घरावरील पत्रे उडाली. आष्टी तालुक्यातील खानापूर येथे घराची छत कोसळून प्रभाकर दिगंबर तावरे, चेतन ज्ञानदेव तावरे, व सौरभ दिगंबर तावरे हे जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुंटेफळ येथे कोंबड्याचे शेड कोसळून नुकसान झाले. पिंपळगाव घाट येथील राजमाता आश्रम शाळेचे छतावरील पत्रे उडाली. कल्याण विशाखापटनम महामार्गावरील बडेवाडी येथील टोलनाक्याचे शेड जोराचा आवाज करत कोसळले.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »