कायमस्वरूपी लव्हाळी पासुन मुक्त व्हा

3

लव्हाळा

१ किलो राजगिरा २० किलो वाळु किंवा घनजिवामृतात कालवून १ एकर क्षेत्रावर फोकुन द्या त्याला पाणी दया. म्हणजे ८-१० दिवसात राजगिरा उगवून येईल. ३-४ पाण्याचा पाळ्या ८-१० दिवसांच्या अंतराने दया. म्हणजे १.५ ते २ महीन्यात हा राजगिरा १.५ ते २ फुट साधारण गुडघ्याएवढा झाला म्हणजे त्याचे मुळ हे लव्हाळ्याच्या गाठींवर जावुन आदळते व लव्हाळयाला मारुन टाकते. एका लव्हाळीच्या झाडाच्या मुळ्यावर ७ गाठी (र्हिज़ोमेस) असतात हया सर्व मरतात लव्हाळीचा नायनाट होतो यानंतर मग आपल्या जवळील मार्केट मधे राजगिरा भाजी विकता येते. नवरात्री मध्ये ही भाजी उपवासात वापरतात, भाव नसेल तर उपटुन किंवा कापुन आच्छादन करा त्यावर डिकंपोस्ट एक किलो + गुळ एक किलो दोन तास भिजत ठेवून ड्रिपने सोडा चांगल्या प्रतिचे कंपोष्ट खत तयार होईल व आपण कायमस्वरूपी लव्हाळी पासुन मुक्त तर व्हालच व आपला उद्देश साध्य होईल.

3 thoughts on “कायमस्वरूपी लव्हाळी पासुन मुक्त व्हा

  1. प्रत्येक एखाद्ये शेत किंवा शेतकर्याची मुलाखत दाखवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »