केळी किड ,रोग व व्यवस्थापन

0

केळी

किड व व्यवस्थापन
मावा  : मावा व त्याची पिल्ले पानाच्या खालच्या भागावर, त्याचप्रमाणे पानाच्या सुरळीमध्ये व कोवळ्या खोडावर रस शोषण करतात. त्यामुळे झाड निस्तेज व कमजोर होऊन त्याची वाढ खुंटते. ही कीड बंचीटॉप या रोगाच्या भ मावा लसीचा प्रसार करते.
नियंत्रण : माव्याच्या नियंत्रणाकरिता केंद्रीय किटकनाशक मंडळाव्दारे लेबल क्लेम शिफारशीत डायमेथोएट ३० टक्के प्रव १० मि.ली., १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा फोरेट १० टक्के सी.जी. २५ ग्रॅम प्रति झाड कार्बोफ्युरॉन ३ टक्के सी.जी. १६६ ग्रॅम प्रति झाड किंवा ऑक्सीडिमेटॉन मिथाईल २५ ई.सी. २० मि.ली. १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. किटकनाशकासोबत सॅण्जोर्वट किंवा जवस तेल यासारखे चिकट द्रव मिसळावे. टीप : पपई, पेरू व चिकू या पिकांवर लेबल क्लेम शिफारशीत किटकनाशक उपलब्ध नाही.
 केळीवरील रोग व व्यवस्थापन
१) पर्णगुच्छ : हा रोग विषाणूमुळे होतो. रोगट बेणे लावल्यास त्यापासून निघालेल्या झाडाची पाने आकाराने अतिशय लहान, निमुळती, फिक्कट हिरव्या रंगाची निपजतात. पानाच्या देठाची व कांड्याची वाढ होत नाही. पानाचा नैसर्गिक फैलाव न झाल्यामुळे ते शेंड्यावर झुपक्यासारखे एकत्र झालेले दिसतात. रोगट झाडे २-३ फुटापेक्षा उंच वाढत नाहीत व झाडाला केळी लागत नाहीत. झाडे सहसा दगावत नाहीत परंतु त्यापासून उत्पन्न मिळत नाही.
पिकाची नियमित पाहणी करून रोगट झाडे समूळ नष्ट करावीत. पीक लागवडीसाठी प्रमाणित /निरोगी वेगे वापरावे. केळीवर मावा किडीचा प्रादुर्भाव होऊ देऊ नये यासाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही ०.०३ टक्के (१० मि.ली.. १० लिटर पाणी) किंवा ऑक्सीडिमेटॉन मिथाईल २५ ई.सी. २० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किटकनाशकासोबत टिनेक्स किंवा जवस तेल यासारखे चिकट द्रव मिसळावे.
२) केवडा : हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. रोगग्रस्त झाडाची पाने पिवळसर पडतात व झाडाची वाढ खुंटते. कालांतराने झाडाचा गाभा सडतो व झाड कोलमडून पडते. रोगट झाडांना घड भरत नाहीत. रोगट झाडे जाळून नष्ट करावीत. 
३) सिगाटोका पानावरील ठिपके : सर्वप्रथम या रोगाची लक्षणे झाडाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या नवीन आलेल्या पानांवर आढळून येतात. लहान स्पिंडल आकाराचे ठिपके ज्यास पिवळे वलय असते व मध्यभाग तपकिरी भुरकट दिसतो व असे ठिपके पानांच्या शिरांच्या समांतर राहतात. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी मँकोझेब ७५% डब्ल्यु. पी. २० ग्रॅम किंवा टेबुकोनॉझोल ५०% + ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉनीन २५% डब्ल्यु.जी. ४ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »