उन्हाळीबाजरी
उन्हाळी बाजरी
उन्हाळी बाजरीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या तारखेपर्यत करावी, कारण जानेवारी महिन्यात तापमान १० अंश सें.ग्रे. पेक्षा खाली गेलेले असल्यास त्याचा उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो. अशा परिस्थितीत पेरणी ही थंडी कमी झाल्यावर करावी. मात्र उन्हाळी बाजरीची लागवड १५ फेब्रुवारी नंतर करू नये. पेरणीस उशीर झाल्यास पीक जात किंवा वाणाप्रमाणे ५० ते ५५ दिवसांनी फुलोऱ्यात येते. अशावेळी तापमान ४२ अंश से.पेक्षा अधिक असल्यास परागकण मरतात व उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात हवामान कोरडे असल्याने अरगट, गोसावी, तांबेरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे धान्य व चाऱ्याची गुणवत्ता चांगली मिळते. संरक्षित पाण्याची सोय असल्यास शेतकऱ्यांच्या फायद्यात वाढ होते.
🙏🙏