मोहरी, जवस लागवड व्यवस्थापन
▬▬▬▬▬●ஜ۩۞۩ஜ●▬▬▬▬▬
🌻 *VDN AGRO TECH* 🌻 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*विनोद धोंगडे मो.नं.9923132233* *मु. नैनपुर ता.सिंदेवाहि जि. चंद्रपुर(म.रा.)*
━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━
*🙏🏻नमस्कार🙏🏻*
*मोहरी, जवस लागवड व्यवस्थापन*
रब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून, त्यात मोहरी, जवस अशा पिकांचे प्रमाण तुलनेने कमी होत आहे. या पिकांच्या लागवड व्यवस्थापनाची माहिती घेऊ.
*जवस*
जमीन : या पिकासाठी मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणारी व चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.
सुधारित वाण : एन एल -९७ व पी. के. व्ही. एन. एल. -२६०
बियाणे : ८ ते १० किलो प्रतिहेक्टरी
बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास कार्बेन्डाझीम किंवा थायरम किंवा कॅप्टन २.५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
पेरणी अंतर व पद्धत : ४५ x १० सेमी. किंवा ३० x ३५ सेमी.
खतमात्रा प्रतिहेक्टरी :
कोरडवाहूसाठी – ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद
बागायतीसाठी -६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद.
अांतर पिके :
जवस + हरभरा (४:२),
जवस + करडई (४:२),
जवस + मोहरी (५:१)
उत्पादन : ५ ते ७ क्विंटल प्रतिहेक्टरी
*मोहरी*
जमीन : या पिकासाठी मध्यम ते भारी व चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.
सुधारित वाण : पुसा जयकिसान, पुसा बोल्ड, शताब्दी आणि जी एम-३
बियाणे : ५ किलो प्रतिहेक्टरी
बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळावे. पेरणीच्या आधी बियाणे ओलसर पोत्यात ठेवले असता उगवण चांगली होते.
पेरणी अंतर व पद्धत : ४५ x १५ सेमी. किंवा ३० x ३५ सेमी.
खतमात्रा प्रतिहेक्टरी :
कोरडवाहूसाठी – ४०किलो नत्र, २० किलो स्फुरद -संपूर्ण पेरणीच्या वेळी
बागायतीसाठी – ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी आणि उरलेले नत्र ३० ते ३५ दिवसांनी)
अांतरपिके : गहू + मोहरी (४:२ किंवा ६:२)
पाणी व्यवस्थापन : ओलिताची सोय असल्यास,
पहिले पाणी शेंगा लागताना (५०ते ५५ दिवसांनी),
दुसरे पाणी दाणे भरताना (७०ते ७५ दिवसांनी)
उत्पादन :
बागायती- १२ ते १५ क्विंटल प्रतिहेक्टरी,
कोरडवाहू- ८ ते १० क्विंटल प्रतिहेक्टरी.
*धन्यवाद….🙏🏻*
*शेतकरी हितार्थ*
*शेअर करा….*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*शेती व शेतीपुरक विषयक माहितीसाठी 9923132233 या नंबरवर Add लिहा किंवा टेलीग्राम लिंक चा वापर करा*
https://t.me/joinchat/HPLYNxc6T9zsH8rPA48oeQ
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬