रासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..

1
शेतकरी बंधूंनो,आपण आज रासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक जाणून घेणार आहोत.
कुठलेही कीटकनाशक खरेदी करताना सर्वसाधारण पणे त्याच्या टक्केवारीच्या मागे आपण EC/SC (इ.सी/ एस.सी) असे लिहिलेले पाहतो. त्याचे कारण व आपल्या फवारणी द्रावणावर त्याचा काय परिणाम होतो हे आपण जाणून घेवूया…
१) ईसी(EC) (ईमल्सीफ्लूएबल कॉन्सट्रेशन) –
याचा हा अर्थ असतो. उदाहरणार्थ – ट्रायझोफॉस ईसी असते.
हे औषध ऑर्गानिक ऑईल सॉल्वंट म्हणजे पारदर्शी द्रवरूप स्वरूपात असते. त्याला पाण्यात टाकले असता ते पांढरे दुधी रंगाचे होते.
 इसी औषध प्रकाराची चांगली गोष्ट म्हणजे हे औषध द्रव लवकर ऍक्टिव्ह किंवा मिश्रण होते.
ईसी प्रकारच्या औषधाची दुबळी बाजू म्हणजे यात  एकापेक्षा अनेक कीटकनाशके एकत्र केले तर त्याक्षणी आपल्या दुसऱ्या औषधाची पावर कमी होऊ शकते.
 याकरिता शक्यतो इसी स्वरूपातील औषधे इसी टाईपच्या औषधांमध्येच मिक्स/एकत्र करा.
२) SC (एस.सी.) सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन-
एस.सी प्रकारातील औषध ही या प्रकारच्या औषधांची वरची ग्रेड किंवा सुधारित आवृत्ती आहे.
या केमिकल मध्ये औषधाची वेजिटेबल पावडर मिश्रण करतात व त्यापासून एस.सी प्रकारची औषधे तयार करतात.
एस.सी प्रकारच्या औषधाचा फायदा एक होतो की त्यामधील औषधी केमिकल सुरक्षित होते व दुसऱ्या केमिकल मध्ये ते मिक्स होत नाही त्यामुळे शक्यतो याची रिअॅक्शन किंवा दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे आपण फवारणी करीत असलेले द्रव्य अधिक परिणामकारक होते.
एस.सी प्रकारच्या औषधाची एक समस्या आहे ती म्हणजे हे औषधी घट्ट, सफेद दुधी रंगात असते. ते औषध द्रवरूप होण्यास थोडा जास्त वेळ घेते. 
हा एवढाच या प्रकारच्या औषधांचा अवगुण आहे, पण यांची परिणामकारकता चांगली आहे त्यामुळे बहुतेक सर्व औषधे हे एस.सी स्वरूपात बनत आहेत.
अशा प्रकारे रासायनिक कीटकनाशकांचे वरील २ प्रकार आपण पाहिलेत. त्यानुसार आपण आपली कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्यावी. त्यामुळे आपल्या किटकनाशकाची परिणामकारकता वाढवू शकतो. तसेच आपल्या फवारणीचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते. यासाठी शेतकरी बंधुंनी कीटकनाशक खरेदी करताना योग्य ती माहिती जाणून घ्यावी.
धन्यवाद
  आपण एससी व इसी(SC/EC) यातील फरक जाणून घेतला.आज आपण डब्ल्यू.डब्ल्यू./डब्ल्यू.एस. जी./डी.पी(WW/WSG/DP) या प्रकारच्या पावडर किंवा दाणेदार स्वरूपातील किटकनाशकांची माहिती पाहणार आहोत.
१) डब्ल्यू.डब्ल्यू(WW) 
  • या प्रकारची कीटकनाशके बाजारात मिळतात. यामध्ये (ऍसिफेट,बाविस्टीन) असे अनेक प्रकार आहेत. ही कीटकनाशके बनविताना सूक्ष्म पीओपी किंवा न्यूट्रल/निष्क्रिय चुना किंवा टाल्कम पावडर वापरली जाते.
  • या प्रकारची औषधे तयार करताना वरील चुना किंवा पीओपी हे वाहक द्रव्य म्हणून (कॅरियर मटरेल) वापरतात.यावर मूळ औषधातील रासायनिक द्रव्य एकत्र करून हे कीटकनाशक तयार केले जाते. 
  • आपण पाण्यात एकत्र केल्यानंतर त्यातील मुळ  रासायनिक द्रव्य पाण्यात सोल्यूबल/ विद्राव्य होते व आपणास योग्य तो परिणाम मिळतो. या कीटकनाशक प्रकारात वाहक किंवा कॅरियर मटेरियल चे प्रमाण 
२) डब्ल्यू.एस.जी (WSG)
 (वाटर सोल्युबल ग्रॅन्युल्स) 
 ही औषधे तयार करताना,त्याचे ग्राइंडिंग (बारीक कण) करताना त्याचे कण ड्रिप किंवा स्प्रे पंप यांच्या नोझल मधून पास होतील या प्रकारे  ग्राइंडर केलेली असतात.उदाहरणार्थ, सल्फर गंधक हे  WSG या स्वरूपात असते.
 ते ड्रिप मधून किंवा स्प्रे पंप मधून जाण्यास किंवा स्प्रे करण्यात अडचणीचे ठरतात. त्यामुळे अशा प्रकारची कीटकनाशके वापरतांना फडक्याने वस्त्र गाळ किंवा गाळून घ्यावी व ती स्प्रे पंपामध्ये किंवा ड्रीप सिस्टीम सोडावी. 
 त्यामुळे आपले होणारे नुकसान टळते व आपणास कीटकनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळतात.
3) एस.जी.(SG) 
(सोल्युबल ग्रॅन्युल्स)
  • ही कीटकनाशके तयार करताना योग्य प्रमाणात स्टार्च व पीओपी यांचे मिश्रण कीटकनाशक टाकून नूडल्स/ शेवाया तयार केल्या जातात.त्या पाण्यात टाकल्या असता विरघळतात.  उदाहरणार्थ -एक्टारा.
४) डी.पी.(DP) (डस्टिंग पावडर) 
ही कीटकनाशके तयार करताना कॅरियर किंवा वाहक मटेरियल जास्त प्रमाणात वापरतात. कारण ही कीटकनाशके कोरड्या स्वरूपात डस्टर द्वारे पिकावर धुरळणी केली जातात.
यामुळे ही कीटकनाशके पाण्यात द्रावण शील असत नाही. यासाठी यांचा फवारणीसाठी उपयोग करू नये.
उदाहरणार्थ –फेनवलरेट ५ टक्के पावडर.
बाजारात काही पावडर युक्त कीटकनाशकांमध्ये सूक्ष्म सिलिका अर्थात सिलिकॉन वापरले जाते. त्यामुळे त्या कीटकनाशकांचा चांगल्या प्रकारे परिणाम मिळतो,त्यामुळे बाजारात पावडर युक्त कीटकनाशके घेताना ती उपलब्ध असल्यास सिलिकॉन युक्त कीटकनाशके घ्यावी.
त्यामुळे पिकास अतिरिक्त सिलिकॉन मिळून पीके सशक्त होतात व कीटकनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळतात.

1 thought on “रासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »