बीजप्रक्रियेसाठी वापरा ट्रायकोडर्मा बुरशी

0

बीजप्रक्रियेसाठी वापरा ट्रायकोडर्मा बुरशी
ट्रायकोडर्मा बुरशीनाशक,ट्रायकोडेर्मा व्हिटीडी जैविक बुरशीनाशक,पिकावरील बुरशी,बुरशी कशी रोखावी,बीज प्रक्रियेचे फायदे,बीजप्रक्रिया कशी करावी,बीज प्रक्रिया कशी करावी,बीजप्रक्रिया,बीज प्रक्रिया,कांदा बीज प्रक्रिया,बीजप्रक्रिया आवश्यक,आले बेणे बीजप्रक्रिया,आले बेणे साठवण व प्रक्रिया,सोयाबीन प्रक्रिया उद्योग,आले लागवड ते प्रक्रिया उद्योग,बीज उपचार के प्रकार,कांदा बियाणे प्रकार,बुरशीनाशक,कांदा बियाणे उगवण क्षमता कशी वाढवावी?,पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवड,आले मराठी माहिती,

बियाणे जमिनीत पेरणीपूर्वी किंवा बियाण्यातून पसरणारे रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा रोगनियंत्रक बुरशी संवर्धकांची बीजप्रक्रिया केल्यास फायद्याचे ठरते. हा रासायनिक बुरशीनाशकासाठी पर्याय ठरू शकतो.
 

जमिनीमध्ये वाढणाऱ्या बुरशी या सेंद्रिय पदार्थावर वाढतात. ट्रायकोडर्मा बुरशी रोग निर्माण करणाऱ्या बुरशीच्या धाग्यावर परोपजीवी पद्धतीने वाढून अपायकारक बुरशीवर नियंत्रण ठेवते. ट्रायकोडर्मा ही बुरशी ट्रायकोडर्मिन, ग्लिओटॉक्सीन, व्हिरिडीन यांसारखी प्रतिजैविके निर्माण करते. या प्रतिजैविकांमुळे पिकांसाठी हानिकारक बुरशी नष्ट होते. ट्रायकोडर्मा बुरशीमुळे मर, मूळकूज, कोंब कुजणे, खोड सडणे, पानगळ इत्यादी रोगांपासून पिकाचे संरक्षण होते.
ट्रायकोडर्मा बुरशीच्या महत्त्वाच्या प्रजाती ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ट्रायकोडर्मा हार्जियानम, ट्रायकोडर्मा हॅमटन या असल्या, तरी त्यातील ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि हार्जियानम या दोन प्रजाती परिणामकारक आहेत. 

  • – ट्रायकोडर्मा या बुरशीचे कवकतंतू रोपाच्या मुळावर पातळ थरात वाढत असल्याने रोगकारक बुरशीचे कवकतंतू मुळात प्रवेश करू शकत नाही.

  • – ट्रायकोडर्मा बुरशीची वाढ हानिकारक बुरशीपेक्षा लवकर होत असल्यामुळे हानिकारक बुरशीच्या धाग्यामध्ये विळखा घालून आपले साम्राज्य पसरविते आणि त्यातील पोषण द्रव्ये शोषून प्रतिजैविके निर्माण करून नष्ट करते व हानिकारक बुरशीची वाढ खुंटते.

  • – ट्रायकोडर्मा बुरशी अपायकारक बुरशीबरोबर अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करून अपायकारक बुरशीला होणारा अन्नाचा पुरवठा कमी करते.

  • – त्याचप्रमाणे ट्रायकोडर्मा बुरशी सेंद्रिय पदार्थांच्या कुजण्याच्या क्रियेत मदत करते.

  • – ट्रायकोडर्मा हार्जियानम व व्हिरिडी यांचे संवर्धन २५० ग्रॅम व १ किलो पाकिटाच्या पावडर स्वरूपात मिळते. 

  • पेरणीच्या वेळी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. सर्व बियाण्यांवर सारखा थर बसेल याची काळजी घ्यावी. बियाणे सावलीत वाळवून ताबडतोब पेरणी करावी. 

  • जमिनीमार्फत होणाऱ्या रोगकारक बुरशीच्या नियंत्रणासाठी १ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा संवर्धके भुकटी २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून हेक्टर क्षेत्रात पसरवून मातीत मिसळावे. 

  • वाफ्यात रोपे तयार झाल्यानंतर लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा ५०० ग्रॅम प्रति ५ लिटर या प्रमाणे द्रावण तयार करून, त्यात रोपाची मुळे ५ मिनिटे बुडवून नंतर त्याची लागवड करावी. 

  • फळझाडांच्या बागेमध्ये ट्रायकोडर्मा बुरशी २५ ग्रॅम प्रति ५ किलो शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून, प्रत्येक झाडाच्या बुंध्याभोवती खांदणी करून मातीत मिसळावे. नंतर पाणी सोडावे. 

  • – विविध प्रकारच्या उदा. रायझोक्टोनिया, फ्युजारियम, स्केलोरोशियम, पिथियम इ. रोगकारक बुरशीवर ट्रायकोडर्मा आपली उपजीविका करते.

  • – जमिनीतील स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया ट्रायकोडर्मामुळे जलद होते.

  • – जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजवून देण्यास तसेच जमीन सुधारण्यास मदत होते. जमिनीचा पोत सुधारतो.

  • – ट्रायकोडर्मा ही बुरशी मानवाला तसे जनावरांना अपायकारक नाही.

  • – शेतातील रोगनियंत्रणासाठी लागणारा खर्च कमी होतो.

Source:
डॉ. के. टी. अपेट, ९४०४५९२७९३
(सहयोगी प्राध्यापक, वनस्पती विकृती शास्त्र विभाग,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »