हळद लागवड तंत्रज्ञान.

1

ठिबक सिंचन पध्दतीने  हळद लागवड तंत्रज्ञान.. 

- हळद लागवडीसाठी १५ मे ते जूनचा पहिला आठवडा हा कालावधी उत्तम समजला जातो.
ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे असल्यास दोन सऱ्यांमधील अंतर ४.५ ते ५ फूट ठेवावे.
त्या सऱ्यावरील माथा सपाट करून एक फूट उंचीचे आणि ६० सें.मी. सपाट माथा असलेले गादीवाफे तयार करावेत. 

–  हळदीच्या उगवणीसाठी ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते, त्यामुळे १५ मे ते जूनचा पहिला आठवडा हळद लागवडीसाठी उत्तम समजला जातो. १५ जूननंतर हळदीची लागवड केल्यास हळदीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.
या पिकास पाणी देण्याच्या पद्धतीनुसार  ठिबक किंवा तुषार सिंचनाची सोय असल्यास गादी वाफे किंवा रुंद वरंब्यावर लागवड करावी. 

   गादी वाफा (ठिबक सिंचन) – 

– ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावयाचे असल्यास दोन सऱ्यांमधील अंतर ४. ५ते ५ फूट ठेवावे. त्या सऱ्यावरील माथा सपाट करून एक फूट उंचीचे आणि ६० सें.मी. सपाट माथा असलेले गादीवाफे तयार करावेत. 
– गादीवाफ्याच्या बरोबर मध्यभागी लॅटरल अंथरून लॅटरलच्या दोन्ही बाजूला १५ सें.मी. अंतरावर कंद उभे किंवा आडवे लावावेत म्हणजेच दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. होईल. दोन कंदांमधीलही अंतर ३० सें.मी. ठेवावे.
एका गादीवाफ्यावर दोन ओळी लावाव्यात. 
– या पध्दतीने लागवड करताना एकरी १०-१२  टन चांगले कुजलेले शेणखत, २०० किलो दाणेदार सिंगल सुपर फास्फेट, १०० किलो पांढरा पोटॅश, १०० निंबोळी पेंड, बोरॅकाल २० किलो खते शेतात मिसळावे
– यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने ही पद्धत खूप फायदेशीर आहे. त्यामुळे हळदीची लागवड आणि काढणी ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे करता येते. तसेच हळदीतील भरणी पॉवर टिलरच्या साह्याने करता येते, त्यामुळे मजुरीमध्ये बचत होते. 
– लागवड करताना कंदावरती २ ते ३ इंच माती येईल या पद्धतीने सोल पुरून लागवड करावी. कंद उभे किंवा आडवे लावावेत. कंदाची निमुळती बाजू खाली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. 
– कंद लावताना शक्यतो गादीवाफे पूर्ण भिजवून घेऊन वाफश्यावरती लागवड करावी किंवा कंद लावल्यानंतर लगेच पाणी सुरू करावे. 
– मे महिन्यामदध्ये लागवड केली असल्यास आच्छादनाचा वापर करावा.
त्यामुळे नवीन अंकुरण होणाऱ्या कंदास इजा पोचणार नाही. 

हळद पिकामध्ये तणनाशकाचा वापर

– हळदीमध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. त्यामुळे शेणखतातून तणांच्या बियांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी हळद लागवडीनंतर लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना ॲट्राझिन हे तणनाशक एक लिटर पाण्यामध्ये चार ग्रॅम घेऊन फवारणी करावी.
त्यानंतर लव्हाळा किंवा हराळी यासारखी तणे दिसत असल्यास ९ व्या ते १० व्या दिवशी ग्लायफोसेट (४१% ) हे तणनाशक ४ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

– पंधरा ते २१ दिवसांनंतर हळदीची उगवण होण्यास सुरवात होते. त्यानंतर हळदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर करू नये. 

हळद पिकामध्ये आंतरपिक लागवड

– हळदीमध्ये आंतरपिके घ्यावयाची असल्यास तणनाशकांचा वापर करू नये.
हळदीमध्ये प्रामुख्याने मुग, उडीद, कांदा, सोयाबीन, झेंडू, मिरची, श्रावण घेवडा, तूर, एरंडी ही आंतरपिके घ्यावीत. 

बेणे प्रक्रिया 

हळदीवर प्रामुख्याने कंदकूज या रोगाचा तसेच कंदमाशी या किडीचा प्रादुर्भाव होतो.
कंदकुजीस कारणीभूत बुरशींचा प्रसार प्रामुख्याने बेण्यामार्फत होतो. त्यासाठी बेणेप्रक्रिया करणे महत्त्वाचे ठरते. 

– बेणेप्रक्रिया करताना बेणे २५ ते ३० मिनिटे मॅलेथिआॅन किंवा क्लोरोपायरीफाॅस ७५०मी. ली.+ बुरशी नाशक  साफ २०० ग्राम कीडनाशकाच्या द्रावणात २०-२५ मिनिटे बुडून राहतील याची दक्षता घ्यावी. 
– साधारणपणे १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बेण्यास वापरावे. 

जैविक बीजप्रक्रिया – 

हळदीमध्ये उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने जीवाणू संवर्धकाची बेणेप्रक्रिया करावी.
यामध्ये अझोस्पिरीलीयम, स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक (पीएसबी), पोटॅश विरघळणारे जीवाणू संवर्धक प्रत्येकी पाच ग्रॅम प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून लागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया कररून लगेच लागवड करावी. 

– रासायनिक व जैविक दोन्ही बीजप्रक्रिया करावयाच्या झाल्यास प्रथम रासायनिक प्रक्रिया करून बेणे सावलीमध्ये ठेवावे.
लागवड करताना जैविक बेणेप्रक्रिया करून लागवड करावी. 

टीप – विद्राव्य खतांच्या मात्रा देताना
अमोनियम सल्फेट, फास्फरीक अॅसीड ८५%, इफको – १७.४४.००, पांढरा पोटॅश, रानडे विद्राव्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा

अधिक माहीतीसाठी व एकरी 40-50 क्विंटल उत्पन्न साठी सर्पंक करा

Source:+add
जगातील नं 1 ठिबक सिचंन कंपनी नेटाफिम ठिबंक…. 

*Plz verify then use do not trust MAC+tech blogs post, thank you!

1 thought on “हळद लागवड तंत्रज्ञान.

  1. मला एक एकर हळद लावगड करायची आहे, चांगले उत्पन्न मिळणे करीता योग्य मार्गदर्शन करावे. माझं पहिलच वर्षं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »