अन्नद्रव्यांची निर्मिती
निसर्गाच्या चार प्रकारच्या यंत्रणा आहेत ज्यात सर्व अन्नद्रव्यांची निर्मिती होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
1) काष्ठ पदार्थांच्या कुजण्यातून उपलब्ध होणारे अन्नद्रव्य.
2) कॅपीलरी फोर्स(केशाकर्षण शक्ती)
3) सायक्लोनस (चक्रीवादळं)
4) गावराणी गांडुळांच्या हालचाली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
3) अन्नचक्र
निसर्गामध्ये अनेक अन्नचक्र असतात आणि प्रत्येक अन्नद्रव्य जिथून निघाले तिथेच जाते. कार्बोहाड्रेड, युरिया,अमोनिया,कर्बोदके
➖➖➖➖➖➖➖➖➖
4)सुक्ष्मपर्यावरण ( मायक्रोक्लायमेट)
गांडुळ फक्त सुक्ष्मपर्यावरणातच काम करतो. जमिनीच्या जडणघडणी मध्ये व सुपिकता निर्माण होण्यामध्ये तसेच घनदाट जंगल उभे होण्यामध्ये देशी गांडूळांची सर्वोत्तम भुमिका असते. जर गांडुळं नसते तर जंगलं उभी झाली नसती व फळबागा उभ्या झाल्या नसत्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖
गांडुळ 24 तास काम करतात, जमिनीच्या खोलवरील सुपिक,समृद्ध माती खातात व विष्ठेच्या रुपात जमिनीच्या पृष्ठभागावर सतत आणून टाकतात व फळ झाडांच्या मुळांना उपलब्ध करून देतात. ही गांडुळांची विष्ठा अन्नद्रव्यांचा भंडार असते. गांडुळे जमिनीमध्ये वरखाली येण्याजाण्यामुळे जमिनीला अनंत कोटी छीद्र पाडतात.कारण गांडुळे जमिनीतून वर येताना ज्या छिद्रातून वर येतो त्या छिद्रातून खाली जात नाही दर वेळी नवे छिद्र करतो .त्यामुळे जमिनीत अनंत कोटी छिद्र पडतात व पावसाच संपूर्ण पाणी ह्या छीद्रांच्या माध्यमातून जमिनीमध्ये मुरते व भुजलामध्ये जमा होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पाणी पावसाळा संपल्यानंतर केशाकर्षण शक्तीमुळे वर येते व पिकांच्या मुळांना पाणी व अन्न उपलब्ध होते. परंतु गांडुळांच्या ह्या
सर्वोत्तम़ कामगिरीसाठी ,जमिनीच्या वर आणि खाली एका विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. त्या स्थितीला सुक्ष्मपर्यावरण म्हणतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
सुक्ष्मपर्यावरण म्हणजे काय ?
जमिनीच्या पृष्ठभागावर उभ्या दोन झाडांच्या दरम्यान जी हवा खेळते त्या हवेचे तापमान 25 अंश सें. ते 32 अंश सें. पाहिजे व त्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 65% ते 72% असले पाहिजे व जमिनीच्या आत मध्ये अंधार, वाफसा, उब, व माया असली पाहिजे. ह्या एकूण एकात्मिक स्थीतीला सुक्ष्मपर्यावरण म्हणतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
झाडांना पाणी पाहिजे. या उलट झाडांना पाणी नको, तर झाडांना वाफसा पाहिजे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
जमिनीच्या आत दोन माती कण समुहांच्या दरम्यान जागा असतात त्या पोकळयांमध्ये पाण्याच अस्थित्व अजिबात नको तर त्याएैवजी त्या पोकळयांमध्ये 50% वाफ व 50% हवा यांच संमिश्रण पाहिजे. या हवा आणि वाफ यांच्या आंतरसंबधांना वाफसा म्हणतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी परस्पर सहजीवनामधील उब आणि माया यांची आवश्यकता असते. तशी ती गांडूळांना सुद्धा त्याची आवश्यकता असते. म्हणून
सुक्ष्मपर्यावरण तयार करण्यासाठी पुढील सहा यंत्रणा उभ्या केल्या पाहिजे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
1. तापमान
2. आर्द्रता
3. अंधार
4.वाफसा
5. उब
6. माया
ह्या सहा यंत्रणा कामाला लावल्यानंतरच सुक्ष्मपर्यावरण तयार होते व त्यासाठी आपल्याला एकच काम केले पाहिजे ,ते म्हणजे जमिनीवर आर्इचा पदर, म्हणजेच आच्छादन झाकले पाहिजे .
➖➖➖➖➖➖➖➖➖
जेव्हा गांडूळ सक्रीय होतात
➖➖➖➖➖➖➖➖➖
सुक्ष्मपर्यावरण उपलब्ध झाल्यानंतर जेंव्हा गांडुळ सक्रीय होतात तेव्हा ते आपली समाधी भंग करतात आणि जमिनीच्या पृष्ठभागाकडे यायला लागतात. आपला सिद्धांत आहे की, खोलवरची अन्नद्रव्यांचा महासागर असते आणि गांडूळ जेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर यायला लागतात तेव्हा ते, खोलवरील ही खनिज समृद्ध माती, वाळूचे कण, चुनखडी, आपल्या सोबत वर आणतात या जमिनीतील रोग निर्माण करणारे राक्षस जंतू खातात व त्यांना नष्ठ करतात. परंतु त्याच वेळेला जमिनीमध्ये असलेले उपयुक्त जंतू व बुर्शी गिळतात ,मात्र त्यांना नष्ठ करीत नाहीत . उलट या जंतूना बलवान सचेतन व कार्यशील करुण विश्टेवाते वर जमीनिवरआणून सोडतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
गांडुळाच्या आतडीमध्ये अशी काही पिसार्इ यंत्रणा (ग्राईंडींग मशीन) असते की खाल्लेले सर्व पिसून काढले जाते. व त्यापासुन तयार झालेली विष्ठा, गांडुळ जमिनीच्या पृष्ठभागावर आणून रोपांच्या ,पिकांच्या मुळीपाशी आणून टाकतात. गांडुळ ज्या छिद्रामधून वर आलेत त्या छिद्रातून ते पुन्हा प्रवेश करत नाहीत तर दर वेळी दुसरे छीद्र पाडून जमिनीमध्ये घुसतात व तिसर्या छीद्रातून वर येतात व विष्ठा जमिनीवर टाकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
देशी गांडुळ जाता येता आपल्या शरिरांमधून वर्मीवाश ( फ्लूर्इड )स्प्रे करतात आणि छिद्रांच्या भिंती लिंपून टाकतात. या स्त्रावामध्ये जीवाणूंच्या जगण्याला आवश्यक व मुळांच्या विकासासाठी आवश्यक विशिष्ट संजीवकं , पोषणद्रव्य , आमिनो आम्ल व प्रतिकारशक्ती वाढविणारे , प्रतीपिंड(अँटीबॉडीज) असतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
ही गांडुळ 24 तास जमिनीमध्ये खालीवर करत असतात व जमिनीला अनंत कोटी छीद्र पाडत असतात. कितीही पाऊस पडला तरीही संपूर्ण पावसाचे पाणी ह्या छीद्रांमधून झिरपल्या जाते व जमिनी अंतर्गत भुजलामध्ये संग्रहीत होतो. व नैसर्गिक पाणलोटक्षेत्र व्यवस्थापन तयार होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
गांडूळाच्या विष्ठेमध्ये काय असते ?
देशी गांडुळाच्या विष्ठेमध्ये सगळया खनिजांचे अनंत भंडार असते. त्या विष्ठेमध्ये भोवतालच्या मातीपेक्षा 7 पट जास्त नाट्रोजन असतो, 9 पट जास्त स्फुरद(फॉस्फेट), 11 पट जास्त, पलाश (पोटॅश), 8 पट चुना (कॅल्शीअम), 10 पट मग्न (मॅग्नेशिअम), 10 पट गंधक (सल्फर), ह्या सोबतच बाकीचे खनिजं जास्त प्रमाणात असतात. ही गांडुळांची विष्ठा मुळाजवळ येऊन पडते, त्यातील सर्व अन्नद्रव्य मुळयांना मिळतात व सोबतच विष्ठेमध्ये असणारे उपयुक्त जंतू नवीन ताकद आणि स्फूर्ती घेऊन ह्युमसच्या निर्मीतीच्या कामाला लागतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
धन्यवाद 🙏