घरच्या घरी तयार करा नैसर्गिक कीटकनाशके

0
घरच्या घरी तयार करा नैसर्गिक कीटकनाशके !

नैसर्गिक किटक नाशके
1). निमास्त्र : 1 एकरसाठी
200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. देशी गार्इचे शेन + 10 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा 10 कि. लींबोळी पावडर
नोट:लिंबाचा  पाला मिक्सरमधून बारीक  करून घेऊ  नये. पाला नेहमी  वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी  करून घ्यावी.
नोट :निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नये. तयार झालेले द्रावण  तसेच फवारावे.
हे मिश्रन एकत्र  करा व चांगले ढवळा व 48 तासांकरिता सावलीत गोणपाट झाकून  ठेवा. दिवसातून दोनदा ढवळा. 48 तासांनंतर कपडयाने गाळून  घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर करा.
निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी  पांढरी माशी, मावा, तुडतुडे व लहान आळयाया साठी होतो निमास्त्राने मोठी आळी मरत नाही
हे निमास्त्र 6 महिने वापरता येतो.
2). ब्रम्हास्त्र:
मोठया आळीसाठी
20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी + 2 कि. कंरजीच्या पानाची चटणी  + 2 कि. शिताफळाच्या पानाची चटनी  2 कि. येरंडीच्या पानाची चटणी  + 2 कि. धोतरयाच्या पानाची चटणी
ह्या चटण्या  टाका व चांगले ढवळा. वर झाकण ठेवा व उकळून घ्या. सतत 4 उकळया येऊ दया. आचेवरून खाली  ठेवा व 48 तास थंड होऊ द्या . दिवसातून दोनदा ढवळा व झाकून ठेवा.
48 तासा नंतर गाळून  घ्या व साठवून ठेवा अथवा वापर करा. हे द्रावण 6 महिन्या पर्यंत चालेल.
1 ऐकर साठी प्रमाण
200 लि. पाणी + 6 लि. ब्रम्हास्त्र
3). अग्नीअस्त्र : हे  बोंड आळी, घाटी आळी साठी
20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
+ 500 ग्रॅम तंबाखू + 500 ग्राम तिखट हिरवी मिरचीचा ठेचा + 250 ग्रॅम गावरानी लसणाची चटणी हे मिश्रन ढवळून घ्या व त्यावर झाकण ठेवा व 4 उकळया येउ दया. 48 तास थंड होऊ दया व दिवसातून दोन वेळा ढवळा. 48 तासानंतर फडक्याने गाळून घ्या व सावलीत साठवून  ठेवा.हे द्रावण  3 महिन्या पर्यंत वापरता येईल.
फवारणी प्रती एकरी
200 लि. पाणी + 6 ते 10 लि. अग्नीअस्त्र
4). दशपर्णी अर्क :
200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि..ताजे देशी गार्इचे शेन + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची  चटणी
हे मिश्रन चांगले ढवळा, व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
दुसऱ्या  दिवशी सकाळी त्या मिश्रनात 10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कि. तंबाखू पावडर + 1 कि. तिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
तिसरया  दिवशी सकाळी त्या मिश्रणात
2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी  + 2 कि. करंजी ची पाने + 2 कि. सीताफळाची पाने + 2 कि. धोतऱ्यायाची पाने + 2 कि. येरंडीची पाने + 2 कि. बेलाची पाने फुलासकट + 2 कि. तुळशीची पाने मंजीरीसकट + 2 कि. झंडुचे  पंचाग ह्यात पान फुले देठ व मुळया + 2 कि.निरगुडीची पाने + 2 कि. टनटनी वा घानेरीची  पाने व फांदया सकट + 2 कि. गावरान पपर्इची पाने  + 2 कि.आंब्याची पाने + 2 कि.गुळवेलीचे तुकडे + 2 कि. ऋचकी ची पाने + 2 कि. कन्हेरिचे पाने + 2 कि. बाउचीच्या फांदया + 2 कि. तरोटयाची पाने + 2 कि. आघाडयाची पाने + 2 कि. शेवग्याची पाने + 2 कि. कंबरमोडी + 2 कि.जास्वंदाची पाने + 2 कि.डाळिंबाची पाने + 2 कि. हराळी
ह्यापैकी कोणतेहि 10 झाडाची पाने परंतु पहिले 5 झाडाची पाने आवश्यकच आहेत.सगळी पाने  मिसळा व 40 दिवसांपर्यंत आंबू द्या  व दिवसातून एकदा ढवळा. ढवळताना नाकाला कापड बांधा. 40 दिवसानंतर कापडाने गाळून घ्या व सवलीत साठवून ठेवा. हे अर्क 6 महिन्या पर्यंत वापरता येईल .
फवारणी प्रती एकरी प्रमाण
200 लि. पाणी + 6 ते 10 लि. दशपर्णीअर्क
5)बुरशी नाशके :
1. 200 लि. पाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत
2. 100 लि.पाणी+5ते6लि.आंबटताक आंबट ताक हे बुरशी नाशक, विषाणू नाशक, संजीवक व जंतूरोधक आहे.
3. 5 कि. रानगौरी मोगरीने  बारिक करा, एका फडक्यामध्ये गाठडी बांधा व त्याला एक दोरी  बांधा. एक मजबूत काडी  घ्या व त्या दोरीचे  टोक काडीला बांधा व 200 लि. पाण्यात बुडवून ठेवा. 48 तासांनंतर पाण्यातून गाठडी बाहेर काडा व पिळून घ्या. ही कृती 3 ते 4 वेळेस करा. त्यानंतर पाणी ढवळून घ्या व फवारणीसाठी वापरा.
4. ऐका भांडयामध्ये 2 लि. पाणी घ्या, त्या मध्ये 200 ग्रॅम सुंठ पावडर टाका व चांगले ढवळून घ्या व झाकन ठेवून त्या द्रावनाला ऊकळा.द्रावनाला आर्धे होर्इ पर्यंत त्याला ऊकळा व थंड होऊ दया. दुसऱ्या  भांडयामध्ये 2 लि. दुध घ्या व ते मंद आचेवर एक उकळी  येऊ दया व त्याला थंड होऊ दया.
200 लि. पाणी + सुंठ अर्क + थंड दुध
हे मिश्रण  चांगले ढवळा व दोन तास ठेवा. त्यानंतर गळून  घ्या व फवारणी  करा. हे द्रावन 48 तासांपर्यंत वापरावे. 1 एकरासाठी हे  पिकांसाठी टॉनीक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »