प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)

0

 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा तपशील:

‘एक राष्ट्र -एक योजना ‘ या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -२०१६ पासून सबंध देशात राबविण्यात आली. ही विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे, मात्र कोणावरही बंधनकारक नाही.हा विमा केवळ ‘उत्पन्नातील घट’ एवढ्यापुरताच मर्यादित नसून पीक काढणीनंतर पिकाचे झालेले नुकसान, तसेच चक्रीवादळे, भूस्खलन, अवकाळी पाऊस इ. स्थानिक पातळीवरील आपत्तींपासूनच्या संरक्षणासाठीही हा विमा उपलब्ध आहे.



प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये (PMFBY)

  1. ही विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे, मात्र कोणावरही बंधनकारक नाही.
  2. खूप कमी विम्याचा हप्ता म्हणजेच प्रीमियममध्ये शेतकऱ्यांचे योगदान लक्षणीयरित्या कमी करण्यात आले आहे, जसे खरीप पिकांसाठी एकुण प्रीमियमच्या २ टक्के , रब्बी पिकांसाठी १.५ टक्के आणि वार्षिक आणि व्यवसायिक पिकांसाठी ५ टक्के शेतकऱ्यांचे योगदान प्रीमियममध्ये ठरविण्यात आले आहे.
  3. या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून सर्व शेतकरी कोणत्याही पिकाच्या उत्पादनाच्या वेळी विमासंरक्षणामुळे धोकादायक पिके सुद्धा घेऊ शकतील.
  4. या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून सर्व शेतकरी कोणत्याही पिकाच्या उत्पादनाच्या वेळी विमासंरक्षणामुळे धोकादायक पिके सुद्धा घेऊ शकतील.
  5. स्थानिक आपत्ती: गारपीट,जलभराव आणि भूस्खलन या आपत्तींना स्थानिक आपत्ती मानले जाईल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत स्थानिक तोटा मानला जाईल व केवळ बाधित शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करून त्यांना योग्य नुकसान भरपाई रक्कम दिली जाईल.
  6. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकर्‍यांमध्ये सकारात्मक उर्जा विकसित होण्यास मदत होईल.















 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »