ग्लायफोसेट तणनाशकाच्या वापरावर बंदी घाला

0

ग्लायफोसेट तणनाशकाच्या वापरावर बंदी घाला

‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाच्या वापरारवर बंदी टाकण्याबाबत येथील कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयाने गुणवत्ता नियंत्रण राज्य संचालकांना पाठविलेल्या प्रस्तावाचा सरकारने गंभीरपणे विचार करावा. तसेच, या विषयाशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करून तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन’चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. विशेष म्हणजे लगतच्या आंध्र प्रदेशमध्ये ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाच्या विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे.
यवतमाळ कृषी अधिकाऱ्याच्या पत्रानुसार, ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाच्या उत्पादनाच्या पाकिटाच्या वेष्टनावरील माहितीनुसार केवळ चहाच्या लागवडीसाठी आणि बिनमहत्त्वाच्या जागेवर या तणनाशकाचा वापर करण्याची परवानगी केंद्रीय कीटकनाशक मंडळाने दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यात चहाची लागवड नसल्याने ‘ग्लायफोसेट’चा वापर करण्याची गरज नाही, असे या पत्रात नमूद केले आहे. सोबतच आंध्र प्रदेशमध्ये विक्रीवर बंदी असल्यामुळे तेलंगनच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधून हे तणनाशक यवतमाळमार्गे मोठ्या प्रमाणात नेण्यात येऊ शकते, अशी चिंताही तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
मागील दोन वर्षात तणनाशक निरोधक एचटी कापसाच्या बियाणांचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला असून हे बियाणे अमेरिकेच्या मोन्सँटो कंपनीकडून सरकारची कोणतीही परवानगी नसताना विकण्यात येत आहे. सामान्यत: कापूस उत्पादकांद्वारे वापरले जाणारे एक तणनाशक औषधी याच मोन्सँटो कंपनीचे ग्लायफोसेट हे उत्पादन आहे. गवत कापण्याचा मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यापने विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून या तणनाशकाला प्राधान्य दिले जात आहे. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिने ग्लायफोसेट या तणनाशकाच्या वापरावर बंदी घालावी, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »