🍆 वांगी 🍆

3
🍆 वांगी 🍆
महाराष्ट्रात वांगी पिकाची लागवड सर्वच जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असून या पिकाखाली अंदाजे २५,००० हेक्टर क्षेत्र आहे. भाजीपाला पिकांच्या लागवडीखालील एकून क्षेत्रापैकी १२ % क्षेत्र या महत्त्वाच्या भाजीपाला पिकाखाली येते. या पिकाच्या क्षेत्र आणि उत्पादन वाढीसाठी मशागतीच्या विविध बाबींची तांत्रिक माहिती असणे आवश्यक आहे.
वांगी लागवड,वांगी,वांगी लागवड माहिती,भरली वांगी,वांगी लागवड अंतर,वांगी भात,वांगी लागवड कशी करावी,चमचमीत भरली वांगी रेसिपी,#वांगी लागवड,मसाला भरली वांगी,वांगी लागवड पद्धत,वांगी खते,उकड वांगी,वांगी लागवड कधी करावी,वांगी लागवड तंत्रज्ञान,वांगी मसाला,वांगी लागवड खत व्यवस्थापन,#वांगी लागवड कशी करावी,भरलेली वांगी,वांगी फवारनी,वांगे खत,वांगी किड व रोग,भरली वांगी भात,३ लाखांची वांगी,वांगी लागवड pdf,वांगी बिर्याणी,वांगी आंतरमशागत,वांगी ट्रीटमेंट,३५ लाखांची वांगी,वांगी लागवड कोणत्या महिन्यात करावी

महत्त्व 
वांग्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे अ, ब आणि क तसेच लोह या खनिजाचे पुरेसे प्रमाण असते. म्हणून पोषक आहाराच्या दृष्टीने वांगी हे एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. 
●वांग्याच्या दर १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात अन्नघटकाचे प्रमाण खालीलप्रमाणे असते.
पाणी – ९३.० %, कार्बोहायड्रेट्स – ४.० %, प्रोटीन्स – १.४%, फॅट्स – ०.३%, तंतुमय पदार्थ – १.३%, खनिजे – ०.३%,कॅल्शियम – ०.०१८%, मॅग्नेशियम – ०.०१६%, फॉस्फरस – ०.०४७%, लोह – ०.००९%, सोडियम – ०.००३%, पोटॅशियम – ०.२%, सल्फर – ०.०४४%, ऑक्झॅलिक  एसिड – ०.०१८%, जीवनसत्त्व ‘अ’ -१२४ इंटनॅशनल युनिट, जीवनसत्त्व ‘क’ – ०.०१२%, उष्मांक(कॅलरी) -२४%, क्लोरीन – ०.०५२%.
वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात खरीप,रब्बी आणि उन्हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपिक म्हणूनही वांग्याची लागवड करतात. आहारात वांग्याची भाजी, भरीत, वांग्याची भजी इत्यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्या रोग्यांना गुणकारी असतात. वांग्याच्या चकत्या वाळवून नंतर त्यांचा वापर करता येतो.
लग्नसराई : खेडेगावमध्ये, किंबहुना तालुक्याच्या जिल्ह्याच्या व लहान शहराच्या ठिकाणी लग्न समारंभाच्या जेवणात वांग्याची भाजी हमखास वाढली जाते. त्यामुळे अशा कालावधीत वांग्यास भरपूर मागणी असते. काटेरी वांग्यास, जांभळसर व हिरव्या रंगाच्या चमेली वांग्यास बाराही महिने मागणी असते

3 thoughts on “🍆 वांगी 🍆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »