अनुदानावर सौर कृषिपंपासाठी राज्यभरातून २३,५८४ अर्ज

0
अनुदानावर सौर कृषिपंपासाठी राज्यभरातून २३,५८४ अर्ज 

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषिपंप वीज जोडण्याचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याची योजना शासनाने आणली आहे. कुसुम योजना असे त्याचे नामकरण झाले असून या योजनेंतर्गत महाराष्ट्रातून २३,५८४ अर्ज आले आहेत, तर महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज १,४५० हे सोलापूर जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत.

शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा अर्थात पीएम कुसुम योजनेला राज्यात गती देण्यात येत आहे. एमएनआरई यांनी २२ जुलै २०१९ रोजी पीएम कुसुम योजनेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. १३ जानेवारी २०२१ रोजी एक लाख सौर कृषिपंप आणि ३० ऑगस्ट २०२२ रोजी पुढील एक लाख सौर कृषिपंप असे एकूण दोन लाख सौर कृषिपंप यांना मान्यता दिली. 
या योजनेंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहेत.  
महा ऊर्जामार्फत शेतकऱ्यांचे नव्याने अर्ज स्वीकारले जात आहेत. १७ मे २०२३ पासून ऑनलाइन पोर्टलवर अर्ज स्वीकारले जात आहेत. या पोर्टलवरील आकडेवारीचा आढावा घेत जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे. – जयेंद्र वाढोवणकर, जिल्हा व्यवस्थापक, महाऊर्जा सोलापूरसोलापूर जिल्हा आघाडीवर…
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »