महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल घसरला, ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

0
            सर्व विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागातील नियमित विद्यार्थ्यांचा निकाल सर्वाधिक (98.11%) आणि सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (92.05%) लागला आहे.पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे.यंदा १०वी निकालात तब्बल ३.११ टक्क्यांनी घट झाली आहे. सर्व विभागीय मंडळांमध्ये  ९५.८७ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी तर ९२.०५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत.
विभागीय उत्तीर्ण टक्केवारी
पुणे : ९५.६४ टक्के
नागपूर : ९२.०५टक्के
औरंगाबाद : ९३.२३ टक्के
मुंबई : ९३.६६ टक्के
कोल्हापूर : ९६.७३ टक्के
अमरावती : ९३.२२ टक्के
नाशिक : ९२.२२ टक्के
लातूर : ९२.६७ टक्के
कोकण : ९८.११टक्के

कसा पाहाल निकाल?

अधिकृत वेबसाइट — mahresult.nic.in वर लॉग इन करा. mahahsscboard.in

महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा.

सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव.

तपशील टाकल्यावरलॉगिन करा आणि तुमचा निकाल तपासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »