हुमणी विशेष माहिती आणि व्यवस्थापन

0
हुमणी
  • हुमणी एक किड आहे.
  • हुमणीचा जीवन क्रम हा पुढील चार अवस्थांमध्ये पूर्ण होतो.
  1. अंडी.
  2. अळी.
  3. कोष.
  4. पतंग.
अळी ही मुख्य अवस्था आहे.
या अवस्थेत हुमणी खूप मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करते. 
अळीचे मुख्य खाद्य झाडाची मुळे, खोडा वरची साल हे आहे. 
आता सविस्तरपणे पाहू:
1) अंडी-
  •  पतंग हा जमिनीत जाऊन 5cm ते 8cm वरती अंडी घालतो. 
  •  एक पतंग साधारणतः 30 ते 50 अंडी घालतो.
  •  अंडी घालण्याचा कालावधी एप्रिल ते मे. 
2) अळी-
  •  हि अवस्था 10 ते 11 महिन्याची असते. या अवस्थेत पहिली 3 ते 4 महिने अळीला खुप खायला लागते म्हणजेच या कालावधीत अळी पिकांना जास्त हानी पोहचवते.
अळी अवस्थेत तीन अवस्था असतात.
प्रथम अवस्था-
अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी. या आळीचा रंग पांढरा असतो. या अळीची भूक खूप असते. हि अळी 30 ते 40 दिवस या अवस्थेत राहते.
दुसरी अवस्था –
या अवस्थेत अळी थोडी मोठी झालेली असते व अळीची भूक वाढलेली असते. या अवस्थेतील अळी खूप नुकसान कारक ठरते.
ही अवस्था 45 ते 65 दिवसाची असते. या अवस्थेत अळीला खायला नाही भेटले तर ती ठराविक काळासाठी सुप्त अवस्थेत जाते. नंतर अनुकूल परिस्थितीत खायला चालु करते.
तिसरी अवस्था
या अवस्थेत अळीची पूर्ण वाढ झालेली असते. अळी जमिनीत खोलवर जाते व  पांढरट पिवळसर रंगाची दिसते. इंग्लिश मधील “C” या आकाराची दिसू लागते. ती जमिनीत अर्ध गोलाकार दिसू लागते. सर्वात जास्त काळ आळी या अवस्थेत असते.
3) कोष-
कोष अवस्थेत अळी 15 ते 20 दिवस असते. कोष अवस्थेतून ती पतंग अवस्थेत जाते.
4) पतंग-
हि शेवटची अवस्था आहे. या अवस्थेत पतंग हा झाडाची पाने खातो. त्यात कडुलिंब, बाभुळ अशा झाडाची पाने  दिवस मावळण्याच्या वेळी /मावळल्यानंतर (संध्याकाळी 6 ते 7 च्या सुमारास)खातात.

हुमणी व्यवस्थापन 
जैविक-
1) मेटारायजिम आणी बिव्हेरिया हे जीवाणु वापरावेत.
नैसर्गिक-
1)रुईचा पाला 4-5 kg घेऊन तो 20 लीटर पाण्यात उकळून घ्यावा व थंड झाल्यावर 200 लीटर पाण्यात टाकुन त्याची अळवणी करावी. (zbns)
पारंपारिक
1) पिक काढणी नंतर लगेच १५-२० से.मी. खोल बलराम किंवा लाकडी नागराने नांगरट करुन घ्यावी किंवा रोटर मारावा.
2) पावसाच्या पहिल्या सरीबरोबर भूंगे जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात होते. हे भूंगे संध्याकाळी 6:30 ते 9:00 वाजेपर्यंत कडुलिंबाच्या झाडावरती असतात. हा काळ त्यांच्या मिलनाचा असतो. अशा वेळेस कडुलिंबाचे झाड हलवावे. हलवल्याबरोबर झाडावरील पतंग(हुमणी) खाली पडतील ते गोळा करा आणी अर्धा तास रॉकेल मध्ये ठेवावे. अशाने पुढचे नुकसान टाळेल.
रासायनिक
1) क्लोरो 2 लिटर + सायापर्मेथरिन 0.5 लिटर ड्रेचिंग किंवा पाट पाण्यातुन सोडावे. काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.
2) बायरचे लेसेण्टा चांगले काम करू शकते. ऊस लागणी नंतर लगेच  ड्रेंचिंग केल्यास चांगला परीणाम मिळतो आणि ऊसाची वाढ देखिल उत्तम होते .
 
 3)सुमिटोमो यांचे DANTOTSU 100 ग्रॅम उत्तम आहे.
4) लेसेंटा २०० ग्रॅम व डेसिस १०० – २५० मिली ४०० लिटर पाण्यातुन आळवणी करावी .
टीप – रासायनिक औषधे शेवटचा पर्याय म्हणून वापरावीत. कारण रसायनांमुळे जमिनीतील गांडूळ मरण पावतात. तसेच इतर उपयोगी जीव -जिवाणूंचा समूळ नाश होतो.
Source-
डॉ. वाय्. टी. जाधव
(Asst. Prof. Deparmnt of Entomolgy,
College of Agriculture, Akluj.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »