हरभरा माहिती new post

0
१. काबुली हरभरा
 ह्या हरभ-याच्या जातीचे दाणे हे आकाराने मोठे असतात. (१०० बियांचे वजन हे २५ ग्रॅम पेक्षा जास्त) दाणे आकाराने गोल आणि क्रिम रंगाचे असतात. रोप मध्यम ते मोठे असते. पानांचा आकार देखिल मोठा असतो, फुल पांढ-या रंगाचे असते.
२. लाल हरभरा 

या हरभ-याच्या जातीचे दाणे हे आकाराने लहान असतात, तसेच पुर्ण गोलाकार नसुन टोकाकडे काही अंशी निमुळते होत जातात. बियांचा रंग हा क्रिम, काळसर, तपकिरी, पिवळसर किंवा हिरवा असतो. एका शेंग मध्ये १ ते २ दाणे भरतात. रोप छोटे असते आणि पानांचा आकार देखिल लहान असतो.
जमिन आणि हवामान –
हरभरा पिकाची लागवड रब्बी पिक म्हणुन केली जाते. चांगली उगवण होण्यासाठी २८ ते ३३ डिग्री सेल्सियस तापमानाची गरज भासते, अशा तापमानात ५ ते ६ दिवसांत उगवण होते. हरभरा पिकाच्या मुळ्या ह्या सोट-मुळ प्रकारातील असुन, मुख्य मुळांस ३ ते ४ उप मुळ्या फुटतात. हरभरा पिकाचे मुळ जमिनीत १.५ ते २ मिटर खोली पर्यंत वाढते. मुळांवरती रायझोबियम हा सहजीवी जीवाणु गाठी करुन राहतो, ज्यामुळे पिकांस हवेतील मुक्त स्वरुपातील नत्र उपलब्ध होत राहतो. हरभरा पिकाची लागवड, जवळपास सर्वच प्रकारच्या जमिनीत केली जाते. जास्त क्षार असलेल्या जमिनीत लागवड केल्यास दाणे निट पोसत नाहीत.
लागवड –
हरभरा पिकाची ऑक्टोबर च्या मध्या पासुन तर नोव्हेंबर च्या मध्या पर्यंत लागवड केली जाते. या काळाच्या आधी किंवा नंतर लागवड केल्यास उत्पादनात घट येते. महाराष्ट्रात ऑक्टोबर मध्ये केलेल्या लागवडीतुन जास्तीत जास्त उत्पादन मिळते. हरभरा पिकाची जास्त रोपांची संख्या एक एकरात ठेवल्यास त्यापासुन जास्त उत्पादन मिळते. एक एकरात लागणा-या ३० किलो वापरावे (दोन ओळीतील अंतर २२.५ सेंमी) तर जास्त उत्पादन मिळते
गवारण लाल हरभरा पिकासाठी दोन ओळीत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवुन पेरणी करावी. तर काबुली हरभरा पिकासाठी दोन ओळीत ४५ सेंमी आणि दोन रोपांत १५ सेंमी अंतर ठेवुन लागवड करावी.
अन्नद्रव्य व्यवस्थापन –
हरभरा पिकांस स्फुरद, पालाश, कॅल्शियम, झिंक, फेरस, बोरॉन तसेच सल्फर (गंधक) या अन्नद्रव्यांची प्रामुख्याने गरज असते. लागवड करण्यापुर्वी हरभरा पिकांस खालिल प्रमाणे जमिनीतुन खते द्यवीत. प्रमाण किलो प्रती एकर
लागवडीनंतर दिवस नत्र स्फुरद पालाश कॅल्शियम नायट्रेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट सल्फर बोरॅक्स किंवा २० टक्के बोरॉन
५-१० दिवस १० २५ २५ १०
३०-३५ दिवस १० १० ५०० ग्रॅम
एकुण १० २५ २५ १० १० १० ५०० ग्रॅम
फवारणीतुन अन्नद्रव्य व्यवस्थापन-
पिकाच्या वाढीची अवस्था फवारणीच्या खतांचा प्रकार प्रमाण प्रती लिटर पाणी
लागवडीनंतर १० – १५ दिवसांत 19-19-19 2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर १५ दिवसांनी २० टक्के बोरॉन 1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत 00-52-34 4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस्  चिलीटेड 2.5-3 ग्रॅम .. किंवा झाड नुसते वाढ होत आसेल तर चमत्कार ची फवारणी घ्यावी..
घाटे पासत असतांना 00-52-34 4-5 ग्रॅम
बोरॉन 1 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ७ दिवसांनी 00-52-34 4-5 ग्रॅम
फुलोरा आणि फलधारणा
फुलांतील पुंकेसर फुल उमलण्याच्या एक दिवस अगोदर मुक्त होतात. ह्या वेळेस स्रीकेसर हे पुकेसरांपासुन दुर असतात, पुकेंसर असलेला देठ त्यानंतर सावकाश पणे स्रीकेसरा कडे वाढत जावुन त्यावर पुकेंसर मुक्त करतो, आणि त्यानंतर परागीभवन होवुन फळ धारणा होते,  त्यासाठी  N A A ची फवारणी घ्यावी हि क्रिया दिवसभर सुरु असते.हरभरा पिकांत घाटे तयार होण्याचा  किंवा बोराॅन  या कालावधी त हा परागीभवनानंतर ५ ते ६ दिवसांनी सुरु होतो. एका रोपावर ३० ते १५० (घाटे) तयार होतात. एका घाटे मध्ये १ ते २ दाणे तयार होतात, जास्तीत जास्त ३ दाणे असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »