आज महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल, असा पहा
नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला, त्यानंतर दहावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते. साधारणपणे दरवर्षी 1 ते 6 जून रोजी निकाल प्रदर्शित होतो.या वर्षी आज म्हणजेच 2 जून रोजी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करणार आहे.
महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2023 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आली,यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) परीक्षेचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.
mahresult.nic.in |
कसा पाहाल निकाल?
- अधिकृत वेबसाइट — mahresult.nic.in वर लॉग इन करा.
- महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा.
- सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव.
- तपशील टाकल्यावर लॉगिन करा आणि तुमचा निकाल तपासा
संपादकीय : दहावी पूर्ण केल्यानंतर पुढे काय ? | संपूर्ण मार्गदर्शन