खानदेशसाठी आनंदाची बातमी, लाखो रोपांची लागवड होणार, पावसाळ्याआधी वन विभाग…

0

खानदेशसाठी आनंदाची बातमी, लाखो रोपांची लागवड होणार, पावसाळ्याआधी वन विभाग…

खानदेशातील वनक्षेत्रात जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात यंदा 47 लाख रोपांची लागवड होणार आहे. पावसाळ्यापूर्वी वन विभागाकडून मोठं नियोजन करण्यात आलं आहे.
धुळे : पावसाळा (Rainy Season) पार्श्वभूमीवर वनविभागाने वृक्ष लागवडीचे नियोजन (Tree plantation planning) सुरू केले आहे. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार (jalgaon, dhule, nandurbar) या तीन जिल्ह्यांमधील वनक्षेत्रामध्ये 2975.11 हेक्टर वनक्षेत्रावर सुमारे 47 लाख 66 हजार रोपांची लागवड होणार असल्याची माहिती धुळे वन विभागाचे वनरक्षक दिगंबर पगार यांनी दिली. दरवर्षी महाराष्ट्रात राज्य सरकारकडून (maharashtra government) रोपांची लागवड करण्यात येते. यावर्षी खानदेश वासियांसाठी मोठी बातमी आहे. पावसाळ्यापुर्वी नव विभागाकडून त्या भागासाठी मोठं नियोजन करण्यात आलं आहे.
वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट
धुळे वनविभागात 916.91 हेक्टर वनक्षेत्रावर 14 लाख 94 हजार वृक्षांची लागवड होणार आहे, तर नंदुरबार वनक्षेत्रात 924 हेक्टर वर अकरा लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. तसेच मेवासी वनविभाग अर्थात तळोदा वनक्षेत्रामध्ये 170 हेक्टर वनक्षेत्रावर चार लाख 25 हजार रोपांची लागवड होणार आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव वनविभागामध्ये 330 हेक्टर क्षेत्रावर पाच लाख 28 हजार झाडे लावली जाणार आहेत. याच जिल्ह्यातील यावल वनक्षेत्रामध्ये 635 हेक्टर वनक्षेत्रावर 12 लाख 19 हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. धुळे वनवृत्ताच्या प्रादेशिक यंत्रणेमार्फत एकूण 2975.11 हेक्टर क्षेत्रावर 47 लाख 66 हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तर सामाजिक वनीकरण विभागामार्फत ही वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट हाती घेतले आहे.
तीन जिल्ह्यासाठी मोठी आनंदाची बातमी
खानदेशातील वनक्षेत्रात जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात यंदा 47 लाख रोपांची लागवड होणार आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात प्रत्येकवर्षी पावसाळ्यापूर्वी अशा वृक्ष लागवडीचं महाराष्ट्र राज्य सरकारकडून नियोजन करण्यात येतं. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्यावर्षी सुध्दा मोठं नियोजन करण्यात आलं आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »