नारळच्या जाती -कोकण

0

* प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी

उंच जाती

१) वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) :- या जातीचे आयुष्यमान ८० ते १०० वर्षे असून, सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी ८० ते १०० फळे मिळतात.

२) लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा):- पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी १५० फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी १४० ते १८० ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण ७२ टक्के असते.

३) प्रताप :- नारळाचा आकार मध्यम, गोल असून, झाड सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून १५० नारळ मिळतात.

उंच जाती

१) वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) :- या जातीचे आयुष्यमान ८० ते १०० वर्षे असून, सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी ८० ते १०० फळे मिळतात.

२)लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) :- पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी १५० फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी १४० ते १८० ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण ७२ टक्के असते.

३)प्रताप ः नारळाचा आकार मध्यम, गोल असून, झाड सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून १५० नारळ मिळतात.

४)फिलिपिन्स ऑर्डिनरी :- नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी २१३ ग्रॅम खोबरे मिळते, तर नारळाचे उत्पादन ९४ ते १५९ असून, सरासरी १०५ नारळ आहे.

ठेंगू जाती

या जातीची झाडे उंचीने ठेंगू असतात आणि लवकर म्हणजे लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम आहे.

संकरित जाती

१) टी × डी (केरासंकरा) :- या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून सरासरी १५० नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण ६८ टक्के इतके असते.

२)टी × डी (चंद्रसंकरा) :- फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रति वर्षी ५५ ते १५८ फळे असते, तर सरासरी उत्पादन ११६ फळे आहे.

Source:
संपर्क : ०२३५२- २३५३३१,प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »