कांद्याच्या पाती पिवळ्या पडत असल्यास

0
कांद्याच्या पाती पिवळ्या पडत असल्यास प्रोफेनोफॉस १५ मिली + स्टिकर किंवा टेब्युकोेनॅझोल १ मिली + स्टिकर किंवा २५ ग्राम डायथेन एम ४५ प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
प्रमुख अन्वेषक, ग्राकृमौसे, मफुकृवि, राहुरी.
सोयाबीन पिकावर चक्री भुंगेराचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ट्रायाझोफॉस ४० ई.सी. ३० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
2.

कांदयावर प्रमुख रोग म्‍हणजे करपा हा रोग बुरशीपासून होतो. पातीवर लांबट गोल तांबूस चटटे पडतात. शेंडयापासून पाने जळाल्‍ यासारखी दिसतात. खरीप कांदयावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येतो. फूलकिडे किंवा अळया हेक्‍टरी अगदी लहान आकाराचे किटक पातीवरील तेलकट पृष्‍टभागात खरडतात. व त्‍यात स्‍त्रवणारा रस शोषतात. त्‍यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात.

उपाय :

फुलकिडे व करपा रोगाच्‍या नियंत्रणासाठी पुनर्लाण केल्‍यानंतर दोन तीन आठवडयांनी प्रती हेक्‍टरी फॉस्‍फॉमिडॉन 85 डब्‍ल्‍यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्‍ल्‍यू एस.सी. 550 मिली अधिक डायथेन एम 45, 75 डब्‍ल्‍यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायथेन झेड – 78, 75 डब्‍ल्‍यू डी पी 1000 ग्रॅम अधक 500 ग्रॅम सॅडोवीट चिकट द्रव्‍य 500 लिटर पाण्‍यात मिसळून पाहिली फवारणी करावी. पहिल्‍या फवारणी नंतर तीन चार आठवडयांनी दुसरी फवारणी करावी. या फवारणीच्‍या वेळी प्रती हेक्‍टरी फॉस्‍फोमिडॉन 85 डब्‍ल्‍यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्‍ल्‍यू. एस.सी. 550 मिली अधिक कॉपर ऑक्झिक्‍लोराईड 50 डब्‍ल्‍यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायिन झेड 78, 75 डब्‍ल्‍यू.डी. पी. 1000 ग्रॅम 500 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

Source :

 http://krishi.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »