Groundnut Rate : हिंगोलीमध्ये भुईमूग शेंगांना ५८०० ते ६४७५ रुपये दर

0

Groundnut Rate : हिंगोलीमध्ये भुईमूग शेंगांना ५८०० ते ६४७५ रुपये दर

दररोज सरासरी ८०० ते १२०० क्विंटल आवक
Groundnut Market : हिंगोली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.३०) भुईमूग शेंगांची (सुकी) (Groundnut ) ८०० क्विंटल आवक झाली. भुईमूग शेंगांना प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ६४७५ रुपये तर सरासरी ६१३७ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मे महिन्याच्या सुरवातीपासून यंदाच्या हंगामातील उन्हाळी भुईमूग शेंगांची आवक होत आहे. हिंगोली तसेच शेजारील परभणी, यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकरी भुईमूग शेंगा विक्रीसाठी आणत आहेत. दररोज सरासरी ८०० ते १२०० क्विंटल भुईमूग शेंगाची आवक होत आहे. एक दिवसाआड आवक होऊन लिलावाद्वारे खरेदी केली जात आहे.
शनिवारी (ता.२७) भुईमूग शेंगांची १००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५ हजार ८०० ते कमाल ६ हजार ५२५ रुपये तर सरासरी ६ हजार १६२ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२५) भुईमूग शेंगाची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५ हजार ८०० ते कमाल ६ हजार ७९० रुपये तर सरासरी ६ हजार २९५ रुपये दर मिळाले. महिनाभरात भुईमूग शेंगांच्या दरात फारशी सुधारणा नाही. किंचित चढ-उतार सुरु आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »