सिताफळ
सिताफळ हे गाळाच्या जमिनीत, पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीत किंवा लाल मुरमाड, हलक्या, खडकाळ, डोंगरकाठच्या जमिनीत, दगड गोटे असलेल्या जमिनीत देखील येते. जमिनी हलकी ते मध्यम व पाण्याचा निचरा होणारी जमिन असावी, : हवामान :कोरडे व उष्ण हवामान सिताफळाच्या झाडांच्या व फळांच्या वाढीसाठी पोषक असून साधारणत: ५०० ते ७५० मि. मी. पाऊस पडणार्‍या भागांमध्ये उत्कृष्ट प्रकारे लागवड करता येते. अति दुष्काळ हानिकारक असतो. मोहोर, फुलोरा येणाऱ्या काळामध्ये कोरडी हवा आवश्यक असते. आर्द्र हवामान सिताफळास चालत नाही. कारण आर्द्र हवामानात पांढरी बुरशी डोळ्यांच्या बेचक्यांत तयार होऊन अळी पडते त्याचे नियंत्रण करणे अवधड आहे.
 जाती :  बाळानगर, पुरंदर, क्लोन, सरस्वती, महालक्ष्मी,  एनएमके-१,
जमीन : हे पीक उथळ, हलक्या मुरमाड डोंगर उताराच्या जमिनीत चांगले वाढते. हलकी ते मध्यम काळी, चांगली निचरा होणारी जमीन सुयोग्य होय. भारी काळ्या, चिबड, पाणी साठून राहणार्‍या अल्कलीयुक्त किंवा चोपण जमिनीत लागवड करु नये. हलक्या जमिनीत एक फुटाच्या आत खोलीत खडकाची तळी लागल्यास लागवड करु नये. उत्तम निचरा असणार्‍या मध्यम प्रकाराच्या जमिनीत हे फळपीक चांगले येते.: पाणी व्यवस्थापन :
सिताफळाच्या झाडांस जास्त पाण्याची आवश्यकता नसते. परंतु फळे पक्क होण्याच्या सुमारास एक दोन वेळेस पाणी फळाचा आकार व दर्जा वाढविण्यासाठी आवश्यक आहे.
:लागवड:
 सिताफळाच्या झाडांची लागवड मुख्यात्वे बियापासून रोपे तयार करून करतात. ताज्या फळातील काढलेल्या बिया लावल्यास उगवण होण्यास वेळ लागतो, परंतु बिया काढल्यानंतर काही महिन्यांनी लावल्यास तीस दिवसांमध्ये उगवण होते.


ड्रिपद्वारे पाणी व्यवस्थापन :महिना पाण्याची गरज लि/झाड/दिवस
जून : १२.८
जुलै : १२.४०
ऑगस्ट : १९.८०
सप्टेंबर : २७.४०
ऑक्टोबर : ३२.१०
नोव्हेंबर : ४०.३०
डिसेंबर : २८.२०
जानेवारी : २९.६०
फेब्रुवारी : ३४.५०
मार्च : ४२.६०
एप्रिल : ४५.००
मे : ५०.५०: 
तण नियंत्रण : ठिबक सिंचन पद्धतीत मुळांच्या कार्यक्षमतेचा भागच ओलसर राहतो. अन्य जमीन कोरडी राहत असल्यामुळे तणांचा उपद्रव कमी होतो. त्यामुळे तणनाशक वापर व आंतरमशागतीच्या खर्चात बचत होते. तणांचा उपद्रव झाला तर योग्य व मर्यादित स्वरूपातच तणनाशके वापरावीत.: खत व्यवस्थापन :लागवडीवेळेस खत प्रती खड्डा –
शेणखत -३० ते ४०किलो , डीएपी- ३०ग्रॅम, सुपर्फॉस्फेट्-५०ग्रॅम,फोरेट २०ग्रॅम, निबोंळी पेंड ५०ग्रॅम, ह्युमिकॉन १०ग्रॅम हीखते खड्ड्यामध्ये भरावीत  
 
लागवडीनंतर खते –
३०वा दिवस -१९:१९:१९-५किलो अधिक युरिया-५किलो
३८वा दिवस -१३:४०:१३-५किलो अधिक मॅग्नेसल्फेट ८किलो
४५वा दिवस-१९:१९:१९-५किलो अधिक झिंकसल्फेट- ५किलो अधिक ह्युमिकॉन-२किलो
५३वा दिवस- १२:६१:००‌-५किलो अधिक फॉस्फरीक १लिटर
५९वा दिवस-१३:४०:१३-७किलो अधिक अन्नपुर्णा ड्रीप २किलो  : आच्छादन : 
सिताफळ पीक सदैव तणविरहीत ठेवावे. यासाठी आच्छादनाचा वापर फायदेशीर ठरतो. बागेमध्ये आच्छादनासाठी पॉलिथीन फिल्म अथवा वाळलेले गवत अथवा पाला-पाचोळा, उसाचे पाचट यांचाही वापर करता येतो. आच्छादनामुळे जमिनीद्वारे होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. जिवाणू संवर्धनास मदत होते व तणांचा उपद्रव कमी होतो. झाडांची उत्पादकता वाढते व चांगल्या प्रतीची फळे उत्पादित होतात.
बहर व्यवस्थापन : उन्हाळी व पावसाळी असे दोन बहर घेतले जातात. उन्हाळी बहर घेत असताना जानेवारी ते मे महिन्यात बागेचा ताण सोडण्यात येतो. या बहराचे उत्पादन जून ते ऑक्टोबर कालावधीत घेण्यात येते. पावसाळी बहर जून-जुलै कालावधीत पावसाच्या आगमनासोबत सुरु होतो. या बहराची फळे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत उपलब्ध होतात.
बहर नियोजनातील काही महत्त्वाच्या टिप्स
बहर घेताना त्या विभागातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश, वार्‍याचा वेग, अवकाळी पाऊस, गारांचा पाऊस, धुके यांचा अभ्यास दर्जेदार उत्पादनासाठी गरजेचा.
सूर्यप्रकाश हा फळांच्या वाढीतील मुख्य घटक आहे. बहराचे पाणी सुरु करण्यापासून ते फळ काढणीपर्यंत चांगला सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे.
आर्द्रता हा अन्य महत्त्वाचा घटक आहे. झाडांची वाढ, फळधारणा, फळांची वाढ, कीड व रोगांचा उपद्रव या बाबतीत तो परिणाम घडवून आणत असतो. जमिनीलगत असलेल्या अधिक आर्द्रतेमुळे सीताफळात सर्वांत अधिक फळधारणा जमिनीलगतच्या भागात आढळून येते.
बहराचे पाणी सोडण्यापूर्वी झाडाची खोडे दोन फुटांपर्यंत पूर्ण रिकामी करावीत. त्यावर बोर्डो मिश्रण, बुरशीनाशक व कीटकनाशकयुक्त लेप द्यावा. (शिफारसीनुसार) बागेची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची बाब आहे, बागेत पडलेली रोगट पाने, फळे, झाडावर लटकलेली काळी फळे बागेबाहेर नेऊन त्यांचा नायनाट करावा. मित्रकिटकांची हानी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
झाडांना वळण व आकार देणे गरजेची बाब आहे. झाडांची उंची दहा फुटांपर्यंत ठेवावी. झाडावर बांडगूळ असेल तर ते समूळ नष्ट करावे. बागेत हवा खेळती राहील याकडे विशेष लक्ष द्यावे.
सिताफळ बहर घेताना आच्छादनाचा वापर खूपच महत्त्वाचा आहे. जीवाणू संवर्धनात त्याचे अधिक महत्त्वाचे स्थान आहे.: 
छाटणी व्यवस्थापन : लागवड केल्यानंतर १२महिन्यात छाटणी करावी,

छाटणी वेळ –
 मार्च ते एप्रिल ३०पर्यत करावी: कीड :मिलिबग(पिठ्या ढेकूण) मिलिबगचा उपद्रव टाळण्यासाठी बहराचे पाणी सुरु करतानाच खोडांना स्टिकीबॅंड लावावेत. त्यामुळे मिलिबगला साहाय्यभूत ठरणारे मुंगळे व मिलिबग झाडावर चढू शकत नाहीत व किडीचा प्रसार थांबवता येतो. मिलिबगचा उपद्रव जमिनीतून सुरु होतो. नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकाचा वापर करावा. डायक्लोरव्हॉस (७६ ई.सी.) २५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २५ मिली किंवा ब्युप्रोफेझीन १५ मिली अधिक फिश ऑईल रोझीन सोप २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या फवारणीनंतर ८ ते १० दिवसांनी मित्रकीटक क्रिप्टोलिमस मॉंट्रोझायरीचे भुंगेरे सोडावेत. त्यानंतर कीटकनाशक फवारणी करु नये. जैविक कीटकनाशक व्हर्टीसिलीयम लेकॅनी चार ग्रॅम अधिक फिश ऑइल रोझीन सोप दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारावे. पावसाळ्यात व हिवाळ्यात या मित्रबुरशीचा वापर करता येतो.:
  रोग : फळे काळी पडणे-फळसड कोलेटोट्रिकम ग्लोरओस्पोराइड्स या बुरशीमुळे सीताफळे काळी पडतात. या रोगामुळे २५ ते ३५ टक्क्यापर्यंत उत्पादनात घट होते. फळधारणा झाल्यापासून दर १५ दिवसांच्या अंतराने बोर्डो मिश्रण (१ टक्का) किंवा मॅन्कोझेब दोन ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम एक ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.: काढणी :
सिताफळाची लागवड केल्यापासून तिसर्‍या वर्षी फळे लागतात. बहराप्रमाणे जून ते जानेवारीपर्यंत फळे बाजारात विक्रीसाठी असतात. पूर्ण वाढ झालेल्या १० वर्षापेक्षा अधिक वयाच्या झाडास १५० ते २२० फळे मिळतात.
सिताफळ तोडणीस आले आहे हे पुढील बाबींवरुन समजते.
फळांवरील खवले उंचावून विलग होतात. डोळा पडतो.
खवल्यात खोलगट भागाचा रंग पांढरट पिवळा दिसतो.
फळधारणेपासून फळे काढणीस जातीप्रमाणे व हवामानानुसार १०० ते १८० दिवस लागतात.
फळांच्या रंगामध्ये बदल होतो. फळे हिरवी असतात. त्यांना फिक्कट हिरवी पिवळसर छटा येते. फळ मऊ किंवा नरम बनते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »