नत्र
पिकासाठी पाण्यानंतर जर कोणते अन्नद्रव्य महत्वाचे असेल तर ते आहे नायट्रोजन. वनस्पतीस जी प्रकाश संश्लेषण क्रिया निसर्गाने बहाल केली आहे, त्या प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी गरजेच्या असलेल्या हरितलवकाची निर्मिती होण्यासाठी नायट्रोजन गरजेचे आहे. सजिवांची वाढ होते, ते पुर्नउत्पादन करु शकतातम्हणुनच त्यांना सजिव म्हंटले जाते. वनस्पती यासजिव आहेत. या वाढीसाठी आणि पुर्नउत्पादनासाठी अँमिनो अँसिड ची तसेच त्यापासुन निर्माण होण्या-या प्रथिनांची (प्रोटिन्स) ची गरज भासते, हे अँमिनो अँसिडस आणि प्रथिने नायट्रोजन पासुनच तयार होतात. प्रथिनांच्या निर्मितीत महत्वाची भुमिका पार पाडणा-या आर.एन.ए. (रायबो न्युक्लिक अँसिड) च्या निर्मितीसाठी देखिल नायट्रोजन गरजेचे आहे. एका पिढी कडुन दुस-या पिढीकडे अनुवंशिक गुणधर्म जाणे, तसेच सजिवांच्या दैनंदिन कार्य क्रमाचा लेखाजोखा ज्या डी.एन.ए. (डी ऑक्सिरायबो न्युक्लिक अँसिड) मधे असतो त्याची निर्मिती देखिल नायट्रोजन मुळेच होते. पिकाच्या भरघोस वाढीसाठी गरजेचे
नायट्रोजन गरजेचे आहे. शिवाय जमिनीतील सुक्ष्मजीव देखिल नायट्रोजन चा वापर करित असतात. नत्र हे अन्नद्रव्य पिकांत वहनशिल असल्याने त्याची कमतरता ही पिकाच्या तळा कडील, किंवा जुन्या पानांवर दिसुन येते. पिक नायट्रोजन हे मास फ्लो पद्धतीने शोषुन घेते. पिकांस नायट्रेट (NO₃⁻) आणि अमोनियम (NH₄⁺) च्या स्वरुपात नत्र शोषुन घेता येते. मास फ्लो म्हणजे पाण्यात जेवढा नत्र विरघळलेला आहे तेवढा नत्र पाण्यासोबत पिक शोषुन घेते. यापैकि नायट्रेट च्या शोषणासाठी पिकांस उर्जेची गरज भासते. अमोनियम (NH₄⁺) चे आयन्स हे धनभार असलेले आयन्स असल्याने त्यांचे शोषण होत असतांना पिकाच्या मुळांव्दारा जमिनीत धनभार असलेले मुक्त हायड्रोजन (H⁺) आयन्स सोडले जातात ज्यामुळे बाहेरिल धनभार असलेले अमोनियम आयन पेशीत आल्यानंतर देखिल पेशीतील एकुण धनभार असलेल्या आयन्स ची संख्या एकसारखी कायम राहते. याचा परिणाम मुळांच्या परिसरातील सामु कमी होण्यात होतो. नायट्रेट आयन्स हे जमिनीतील हायड्रोजन आयन्स च्या सोबत मुळांमध्ये प्रवेश करतात. या क्रियेमध्ये हायड्रोजन आयन्स चा वापर हा नायट्रेट आयन्स मुळांमधे शिरण्यात मदत व्हावी म्हणुन केला जातो. यामुळे मुळांच्या परिसरातील सामु हा वाढतो. पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात पिकांस अमोनियम जास्त उपयुक्त ठरते तर पिकाच्या वाढीच्या नंतरच्या काळात नायट्रेट जास्त प्रमाणात उपयुक्त ठरते. ज्या खतात अमोनिकल स्वरुपातील नत्र हा स्फुरद सोबत असतो (उदा. डि.ए.पी., एम.ए.पी.) त्या खतातुन स्फुरद चे शोषण जास्त ते, तसे नायट्रेट स्वरुपातील नत्र आणि स्फुरद सोबत असल्यास होत नाही.नत्र अन्नद्रव्याची कमतरता असल्यास इतर सर्वचअन्नद्रव्यांची कमतरता जाणवते, कारण हेच असु शकते कि पिकाची वाढ नत्र कमतरतेमुळे कमी होते. 
नत्र युक्त खतांच्या जास्त प्रमाणातील वापरामुळे पिकामध्ये बोरॉन, कॉपर, आणि पोटॅशियम ची कमतरता जाणवते. तर नत्र युक्त खतांच्या वापराने पिकातील मॅग्नेशियम ची मागणी देखिल वाढते. मॉलिब्डेनियम च्या वापरातुन नत्राचा वापर देखिल सुधारतो. नायट्रेट आणि अमोनियम च्या वापरतुन देखिल फॉस्फोरस चे शोषण वाढते. ज्या जमिनीत अगर पाण्यात क्लोरिन चे प्रमाण जास्त असते तेथे नायट्रेट चे शोषण कमी होते. नत्राच्या कमतरतेमुळे पिकाची जुनी पाने तळाकडुन टोकाकडे पिवळी पडतात. अनेक पिकांमध्ये नत्र हे परागीभवन होण्यासाठी गरजेचे असते. द्राक्ष, संत्री पिकात नत्र परागीभवनात भुमिका पार पाडते. नत्र कमतरतेमुळे पिक लवकर फुलो-यावर येते, तसेच पिकाचे त्यामुळे उत्पादन देखिल कमी होते. पिकाची वाढ कमी होते. अतिशय जास्त प्रमाणात कमतरता असल्यास पानांवर कडनेलालसर ठिपके पडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »