विविध जैविक ओळख jan17

0
विविध जैविक  ओळख :—
     *******************
**ऍझोटोबॅक्‍टर :—
  

जैविक खतातील जिवाणू नत्र स्थिर करण्याबरोबर विशिष्ट प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे पदार्थ तयार करतात.
त्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून पिके निरोगी होतात.
सेंद्रिय पदार्थांचे लवकर विघटन होते.
जमिनीत फायदेशीर जिवाणूंची संख्या वाढते.
मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

पिकांच्या उत्पादनात 10-15 टक्के वाढ होते.
निसर्गतःच जमिनीमध्ये असंख्य सूक्ष्मजीव वास्तव्य करीत असतात.
त्यामध्ये जिवाणू, बुरशी आदींचा समावेश असतो.
हे जिवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्ये व अन्न घटक वितरणाचे व उपलब्ध करण्याचे कार्य करतात.
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर जमिनीतील फायदेशीर जिवाणूंची संख्या वाढविणे गरजेचे असते.
फायदेशीर जिवाणूंमध्ये रायझोबियम, ऍझोटोबॅक्‍टर, ऍझोस्पिरिलम, निळे, हिरवे शेवाळे वातावरणातील निसर्गतः उपलब्ध असलेला नत्र स्थिर करतात.
त्याच प्रमाणे स्फुरद विरघळविणारे जिवाणू
उदा. —
बॅसिलस मेगॅथेरियम, बॅसिलस पॉलिमिक्‍झा पेनिसिलियम, ऍस्परजिलस, स्युडोमोनास स्पे. इत्यादी
जमिनीमध्ये नैसर्गिकता उपलब्ध असलेल्या घट्ट स्वरूपातील स्फुरदाचे विघटन करून द्राव्य स्वरूपातील स्फुरदात रूपांतर करतात.
सध्याच्या काळात मायकोरायझा जिवाणूला बरेच महत्त्व आले आहे.
त्याच्या वापरामुळे पिकांना जास्तीत जास्त किंवा पुरेशा प्रमाणात स्फुरदाचा, तसेच पाण्याचा, अन्य सूक्ष्म अन्नघटकांचा पुरवठा होत असतो.
**जैविक खते :—
   ***********

ही खते म्हणजे माध्यमाच्या आधारे तयार केलेले सूक्ष्म जिवाणूच असतात.

ही जैविक खते पावडर किंवा भुकटीमध्ये किंवा द्रवरूपात देखील तयार केलेली असतात.
ही खते तयार करण्याच्या वेळी एक ग्रॅम जैविक खतामध्ये कमीत कमी 5 x 10-7 जिवाणू त्यात असणे आवश्‍यक आहे.
तसेच द्रवरूपी जैविक खत असल्यास 1 x 10-8 जिवाणू प्रति मि.लि. असणे आवश्‍यक आहे.
हे जैविक खत शुद्ध स्थितीत असायला हवे.
**जैविक खतांचे मुख्य प्रकार :—
   ***********************
1) नत्रयुक्त जैविक खते,
2) स्फुरद युक्त जैविक खते,
3) मायकोरायझा,
4) पालाश जैविक खते,
5) झिंकयुक्त जैविक खते
**नत्रयुक्त जैविक खते :—
   *****************
संपूर्ण पृथ्वीतलावर जवळपास 150 लक्ष टन नत्र स्थिर होते.
त्यापैकी 50 लक्ष टन औद्योगिक कारखान्याद्वारे स्थिर होते.
30 लक्ष टन नत्र नैसर्गिक विजेमार्फत स्थिर केले जाते.
साधारणपणे 170 लक्ष टन नत्र मातीच्या व पाण्यातील सूक्ष्म जिवाणूंद्वारे स्थिर केले जाते.
नत्रयुक्त जैविकखते तयार करताना जास्तीत जास्त नत्र स्थिर करणारे कार्यक्षम जिवाणू वापरले जातात.
त्या खतांमध्ये पिकाच्या प्रकाराप्रमाणे जिवाणू वापरले जातात.
उदा.
डाळवर्गीय पिकांसाठी वेगवेगळे रायझोबियम जिवाणू व अन्य पिकांसाठी ऍझोटोबॅक्‍टर, ऍझोस्पिरिलम, ऍसिटोबॅक्‍टर यांचा वापर होतो.
त्यापैकी ऍझोस्पिरिलम जिवाणू ऊस आणि भाताच्या पिकांसाठी वापरता�त.
व ऍसिटोबॅक्‍टर हा केवळ उसासाठीच वापरतात.
**स्फुरदयुक्त जैविक खते :—
   ********************
निसर्गतःच जमीन, पाणी, सेंद्रिय खते, प्राण्यांच्या व पिकांच्या अवशेषांमध्ये स्फुरद असतो.
परंतु प्रत्येक वेळी हा स्फुरद पिकांना त्यांच्या वाढीसाठी उपलब्ध होतोच असे नाही.
स्फुरदाची उपलब्धता जमिनीच्या सामूवर (पीएच) अवलंबून असते.
अशा वेळी निसर्गात काही जिवाणू असे आहेत की जे या अविद्राव्य स्फुरदावर प्रक्रिया करतात.
या जिवाणूंमध्ये बॅसिलस पोलिमिक्‍सा बॅसिलस मेगॅथेरियम,  सुडोमोनास स्ट्रायेटा आदींचा समावेश होतो.
हे जिवाणू मातीत विशिष्ट प्रकारच्या आम्लांची निर्मिती करतात व स्फुरदाचे विघटन करून त्याला द्राव्य स्थितीत आणतात.
जेणे करून पिके सहजपणे हा द्राव्य स्फुरद घेऊ शकतात.
स्फुरदयुक्त जैविक खते याच कार्यक्षम जिवाणूंपासून तयार केलेले असतात.
**मायकोरायझा :—
   *************

मायकोरायझा जैविक खते स्फुरदयुक्त जैविक खतात मोडतात.

पिकांच्या मुळात वास्तव्य करणाऱ्या फायदेशीर बुरशींना मायकोरायझा म्हणतात.
एक्‍टोमायकोरायझा व एन्डोमायकोरायझा असे याचे दोन प्रकार आहेत.
ही बुरशी मुळाच्या वरच्या थरात शिरून कार्य करते.
एकदा मुळात शिरकाव झाल्यानंतर त्याचे तंतुमय धागे मुळांच्या पेशीत आपले जाळे पसरवितात.
त्यालाच “अरबसल्स’ म्हणतात.
अ या तंतुमय धाग्यांद्वारे मायकोरायझा जमिनीतील विखुरलेली आवश्‍यक अन्नघटके व सूक्ष्म अन्नघटके, स्फुरद, पाणी शोषून मुळांच्या पेशीत आणतात.
अरबसल्समधून ती पिकांना पुरवली जातात.
या प्रक्रियेनंतर मुळांच्या पेशीत लहान लहान गोलाकार ग्रंथी तयार होतात.
यात पिकांना पुरविल्यानंतर उरलेले अन्नघटके साठवून ठेवले जातात.
हीच अन्नघटके दुष्काळी परिस्थितीत पिकांना पुरविली जातात.
मायकोरायझा खते सर्वच पिकांसाठी, मृद्‌ उपचार पद्धतीने वापरली जातात.
माहिती संदर्भ व स्रोत :—
20 मे 2013, अॅग्रोवन.
डॉ. सरिता मोवाडे, डॉ. ऋषिपाल सिंह,
डॉ. अजयसिंग राजपूत, रमेश चंद्र.
(लेखक – डॉ. सविता मोवाडे, 
क्षेत्रीय जैविक शेती केंन्द्र, जबलपुर (मध्यप्रदेश) येथे कार्यरत आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »