लसुण लागवड व्यवस्थापण असे करा
लसुण लागवड व्यवस्थापण असे करा
♥लसूण सुधारित जाती
गोदावरी (सिलेक्शन-2),
श्वेता (सिलेक्शन-10),
फुले बसवंत,
ऍग्रिफाउंड व्हाइट (जी-41),
यमुना सफेद (जी-50)
जी-1 व
जी-323 इ. जाती मैदानी भागाकरिता उपयुक्त आहेत.

राज्यात प्रामुख्याने जांभळ्या लसणाला जास्त मागणी असते व बाजारभावही पांढऱ्या लसणापेक्षा चांगला मिळतो.
♥लसुण पाकळ्या निवड अशी करावी
लागवडीसाठी 1.5 ग्रॅम वजनाच्या पाकळ्या वापराव्यात.
पोचट किंवा पिवळसर रंगाच्या, लहान पाकळ्या वापरू नयेत.
त्यामुळे गड्डे उशिरा तयार होतात व उत्पादन घटते.
मागील हंगामात तयार झालेले व थंड आणि कोरड्या जागेत साठवून पुरेशी विश्रांती मिळालेले मोठ्या आकाराचे गड्डे लागवडीसाठी वापरावेत.
हेक्टरी सहा क्विंटल बियाणे लागते.
लागवडीसाठी पाकळ्या वेगळ्या करताना वरच्या पापुद्य्राला अथवा पाकळ्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

♥ लसणाच्या पाकळ्या टोकण करून लावाव्या लागतात.
निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात 15 X 10 सेमी अंतरावर व 2 सेमी खोलीवर लावाव्यात.
साधारणपणे या अंतराने 60 झाडे प्रती चौ. मीटरला बसतात.
रूंदीशी समांतर वाफ्यात दर 15 सेमी अंतरावर पाकळ्या किंवा कुड्या उभ्या ठेवाव्यात व नंतर मातीने झाकुन घ्याव्यात.
पाकळ्या उभ्या लावल्यामुळे उगवण एकसारखी होते.
सपाट वाफ्यात फार ढेकळे असतील तर हलके पाणी देऊन नंतर लागवड करावी. लागवडीसाठी मजुरीचा खर्च बराच येतो.
लागवड खर्चात कपात करण्यासाठी गुजरातमधील शेतकरी पाकळ्यांची पेरणी करतात. पेरणीमध्ये 2 ओळीत अंतर राखता येते परंतु 2 झाडातील अंतर कायम राखता येत नाही.
2 किंवा त्यापेक्षा अधीक पाकळ्या जवळ पडल्या तर गड्डे चपटे होतात.
शिवाय पाकळ्या आडव्या किंवा उलट्या पण पडतात.
त्यामुळे उगवण एकसारखी होत नाही.
अलिकडे हाताने ओढता येणारे लसुण लागवडीचे यंत्र लुधीयाना कृषि विद्यापीठाने विकसीत केले आहे.
या यंत्रामुळे लागवड खर्चात बरीच कपात होते व ओळी आणि झाडे यातील अंतर सारखे राखता येते.
ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनावर लागवड करताना संच चालवुन वाफ्यात पाणी द्यावे व नंतर वाफस्यावर पाकळ्यांची टोकणी करावी.

♥ लसूण पाकळ्या वर करावयाची कार्बोसल्फानची प्रक्रिया
लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या कार्बोसल्फानच्या द्रावणात 2 तास बुडवुन मग लागवड करावी.
10 लीटर पाण्यात 20 मीली कार्बोसल्फान मिसळुन द्रावण तयार करावे.

♥लसुण पूर्वमशागत, रानबांधणी व लागवड
खोलवर नांगरट करून लव्हाळ्याच्या गाठी व हरळीच्या काशा वेचून नष्ट कराव्यात व दोन-तीन कुळवाच्या पळा घालाव्यात.
शेवटच्या कुळवणीच्या वेळी हेक्टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
लागवड सपाट वाफ्यावरच करावी, त्यासाठी जमिनीच्या उतारानुसार 4 2 किंवा 3 2 मीटर अंतराचे सपाट वाफे तयार करावेत.
जमिनीला उतार जास्त असल्यास लहान आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.
जमीन सपाट असल्यास दीड ते दोन मीटर रुंद व 10 ते 12 मीटर लांब सरी वाफे तयार करावे.
दोन ओळींतील अंतर 15 सें.मी. व दोन पाकळ्यांतील अंतर दहा सें.मी. (15 10 सें.मी.) ठेवून दोन ते तीन सें.मी. खोलीवर टोकन पद्धतीने पाकळ्या उभ्या लावून कोरड्या मातीने झाकाव्यात. उभ्या पाकळ्या लावल्याने एकसारखी उगवण होते.
लागवडीपूर्वी पाकळ्या कार्बोसल्फान 20 मि.लि. व कार्बेन्डाझि 15 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्याच्या द्रावणात दोन तास बुडवून नंतर लागवड करावी.

♥लसुण लागवड उपयुक्त काळावधी
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात करावी, त्यामुळे डिसेंबर, जानेवारी हा काळ लसणाचा गड्डा भरण्यास अनुकूल असतो.
उशिरा लागवड झाली तर गड्ड्यांचा आकार कमी होतो. वजन कमी भरते व उत्पादनदेखील कमी येते.

♥लसूण खत व्यवस्थापण असे कराल
लसणाच्या उत्तम वाढीसाठी व अधिक उत्पन्नासाठी शेणखताची गरज असते.
हेक्टरी 25 ते 30 टन शेणखत मशागत करतेवेळी जमिनीत मिसळावे.
या व्यतिरिक्त नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा रासायनिक खतातून देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील जमिनीसाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रति हेक्टर देण्याची शिफारस आहे.
50 टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश यांची मात्रा पाकळ्यांची टोकण करण्यापूर्वी द्यावी.

उरलेली नत्राची मात्रा दोन भागांत किंवा हप्त्यांत विभागून द्यावी.
पहिली मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी व
दुसरी मात्रा 45 ते 50 दिवसांनी द्यावी.
पहिली मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी व
दुसरी मात्रा 45 ते 50 दिवसांनी द्यावी.
नत्राची मात्रा लागवडीनंतर 60 दिवसांनी देऊ नये, यामुळे उत्पादन व साठवणीवर विपरीत परिणाम होतो.
अलीकडेच करण्यात आलेल्या प्रयोगावरून कांदा व लसूण ही पिके गंधकयुक्त खतास प्रतिसाद देतात असे दिसून आले आहे,
म्हणून भरखते देताना अमोनिअम सल्फेट व सुपर फॉस्फेट यांसारख्या खतांचा उपयोग केल्यास आवश्यक गंधकाची मात्रा पिकास मिळते.

मिश्र खते वापरल्यामुळे आवश्यक गंधकाची पूर्ती होत नसल्याने लागवड करण्यापूर्वी प्रति हेक्टरी 50 किलोग्रॅम गंधक जमिनीत खताबरोबर मिसळावे.
सल्फेक्स 85 वेटेबल पावडर दीड ते दोन ग्रॅम या प्रमाणात पाण्यात चिकटणा-या पदार्थाबरोबर मिसळून फवारणी करणे लाभदायक असते.

शेणखताच्या कमी वापरामुळे सूक्ष्म तत्त्वांची कमतरता जाणवते. यासाठी आवश्यक असल्यास झिंक फॉस्फेट, मॅंगनिज सल्फेट व कॉपर सल्फेट यांची फवारणी 0.5 टक्के, तर फेरस सल्फेटची फवारणी 0.5 ते 0.1 टक्के या प्रमाणात करावी.
♥लसूण पाणी व्यवस्थापण असे कराल
लसणाची मुळे जमिनीच्या 15 ते 20 सें.मी.च्या थरात असतात, त्यामुळे वरच्या थरात ओलावा कायम असणे आवश्यक असते.
या पिकास जुजबी, परंतु नियमित पाणी लागते.
लसणाच्या पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
आंबवणी साधारणतः तीन-चार दिवसांनी द्यावे.
नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यांत दहा ते 12 दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात सात-आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

♥साधारणपणे 12 ते 15 पाण्याच्या पाळ्या लागतात.
ठिबक सिंचनासाठी इनलाइन ड्रीपर असणा-या 16 मि.मी. जाडीच्या लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रीपरमधील अंतर 30 ते 40 सें.मी. असावे, त्याची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता अडीच ते चार लिटर प्रति ताशी असावी.
तुषार सिंचनासाठी ताशी 135 ते 150 लिटर पाणी सहा ते सात मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावेत.
तुषार सिंचनासाठी पाणी चांगले असावे.
लसणासाठी पाणी देण्याचे सरासरी कोष्टक शेजारी दिले आहे.

♥लसूण हे तापमानाबाबत संवेदनक्षम पीक आहे.
पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात किंचित दमट व थंड हवामान, तर गड्डा पक्व होताना व काढणीवेळी कोरडे हवामान लागते.
पाण्याचा निचरा होणारी, हलकी ते मध्यम, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी.

♥ लसूण मातीचा सामू
लसूण मातीचा सामू 6.5 ते 7.0 या दरम्यान असावा. भारी, क्षारयुक्त, चोपण जमिनी लागवडीसाठी टाळाव्यात.
♥लसूण काढणीचे लक्षण असे ओळखाल
पिकाची 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाने पिवळी पडून सुकल्यावर पीक काढणीस तयार होते. अशा अवस्थेपूर्वी 8 ते 15 दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे.
लसूण पिकापासून 7 ते 8 टन हेक्टरी उत्पादन मिळते.

♥लसूण पॅकिंग अशी कराल
लसूण पीक काढणीनंतर लसून चांगला वाळलेला असला पाहिजे.
गड्डे योग्य प्रकारे प्रतवारी करून जाळीदार पिशव्यांमध्ये पॅकिंग केले जाते.
त्यानंतर विक्री केली जाते.

♥लसुण साठवण अशी कराल
वर्षभर साठवण करण्यासाठी लसणाच्या वाळलेल्या पातीसहीत जुड्या बांधून साठवण करता येते. जुड्या टांगून ठेवाव्यात.
पात कापून निवड करून जाळीदार पिशव्यांमध्ये लसणाची साठवण करता येते.
साठवण करण्याच्या ठिकाणी हवा खेळती राहणे आवश्यक आहे.
तसेच साठवणीपूर्वी लसून चांगला वाळलेला असला पाहिजे.

लसूण पूर्ण पक्व न होता काढणी केल्यास साठवणीत नुकसान होते.
साठवणीत प्रामुख्याने वजनात घट होते.
साठवणीत प्रामुख्याने वजनात घट होते.
♥लसूण पीकाच्या काढणीनंतर नांगरणी करून शेतात एकरी 10 टन शेणखत टाकावे. त्यानंतर आले पिकाची लागवड केली जाउ शकते.
Source:
राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र,
राजगुरूनगर,
जि. पुणे.
फोन – 02135- 222026, 222697
राजगुरूनगर,
जि. पुणे.
फोन – 02135- 222026, 222697
राष्ट्रीय फलोद्यान संशोधन व विकास संस्था,
नाशिक
फोन – 02550-237816, 237551, 202422
नाशिक
फोन – 02550-237816, 237551, 202422
लसूण लागवड आणि बियाणे यांची माहिती कशी मिळेल
नामदेव ननेकर चिंचोली मोराची
९८२२५३३६९२
अतिशय सुंदर माहिती
लसना वरील रोग व्यवस्थान कसे करावे