शेवंती
शेवंती
: जमीन :
ज्या जमिनीचा सामू साडेसात ते सात आहे, अशा जमिनी लागवडीसाठी चांगल्या असतात. मध्यम हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी.
: हवामान :
शेवंतीच्या वाढीसाठी २० ते ३० अंश से, तर फुले येण्यासाठी १० ते १७ सें. अंश तापमानाची आवश्यकता असते. शेवंतीची सुरवातीची वाढ जोमदार झाल्यास उत्पादन भरपूर व दर्जेदार मिळते. जास्त आर्द्रता व भरपूर सतत पडणारा पाऊस या पिकाला मानवत नाही. हलका ते मध्यम पडणारा पाऊस शेवंतीसाठी पोषक ठरतो. दीर्घकाळ पडणार्या पावसामुळे शेवंती मूळबुजव्या रोगास बळी पडते.
: वाणांची नावे :
ओपनमधील वाण –
१) खुबन्याची शेवंती.
२) बेळगाव शेवंती.
पॉलीहाऊस मधील वाण –
१) मोनालीसा. (कट फ्लावर्स)
२) व्हायफर (पसरणारी)
३) व्हिनर
: बियाण्याचे प्रमाण :
१ ते १.२५ लाख छाटे / काशा हेक्टरी
: लागवडीची पद्धत :
सरी वरंब्या
: आंतरमशागत :
वेळोवेळी निंदणी करुन पीक तणमुक्त ठेवावे. निंदणीमुळे जमीन भुसभुशीत राहून पिकाची जोमदार वाढ होते. झाडाची वाढ मर्यादित राहण्यासाठी आणि अधिक उत्पादनासाठी शेवंतीच्या झाडाचा शेंडा खुडण्याचा प्रघात आहे. शेंडा खुडण्याचे काम लागवडीनंतर साधारणत: चौथ्या आठवड्यानंतर करावे. शेंडा खुडल्याने अधिक फुटवे फुटून फुलांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
:खत व्यवस्थापन:
शेवंतीच्या उत्तम वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी लागवडीपूर्वी जमीन तयार करताना एकरी १० ते १२ टन शेणखत जमिनीत मिसळावे.
लागवडीच्या वेळी एकरी ६०:८०:८० किलो नत्र-स्फुरद-पालाश तर लागवडीनंतर एक ते दीड महिन्याने ३० किलो नत्र एकरी याप्रमाणात द्यावे. (युरिया १३०किलो, एसएसपी – ५००किलो आणि एमओपी – १३३किलो किंवा १०:२६:२६ – ३००किलो म्हणजे ६ बॅग व युरिया ६३किलो म्हणजे १बॅग).
: पेरनिचे अंतर :
३० × ३० सें.मी.
: पेरणीची वेळ :
उन्हाळी (एप्रिल – मे)
: खते :
२५ ते ३० टन शेणखत ३००:२००:२०० नत्र:स्फुरद:पालाश कि/हे.
: पाण्याचे व्यवस्थापन :
लागवड उन्हाळी हंगामात करावयाची असल्याने पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीपासून पाऊस सुरु होईपर्यंत पाच ते सात दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्यानंतर गरजेप्रमाणे पाणी द्यावे. फुले येण्याच्या व फुलण्याच्या काळात पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. हिवाळी हंगामात १२ ते १५ दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे जरुर तेवढे पाणी द्यावे. जरुरीपेक्षा जास्त पाणी देऊ नये. जादा झालेले पाणी खोडाच्या तळाशी सरीत साठून राहिल्यास मूळकुज रोग होतो. म्हणून पावसाळ्याच्या पाण्याचायोग्य निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
:फवारणी व्यवस्थापन:
शेवंतीवर मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, मिली बग, अळी इ…. किडींचा तसेच करपा, काडी मर, फुलगळ, फुलकुज इ.. रोगांचा प्रादुर्भाव होतो यासाठी पुढील फवारणी वेळापत्रकाचा वापर करावा.
फवारणी प्रति २०० लिटर पाणी-
१) रोगार २५०मिली + अॅसाटाफ २५०ग्रॅम.
किंवा
२) प्राईड १५० ग्रॅम + नुवान २००मिली + निम २५० मिलि.
किंवा
३) कराटे २५० ग्रॅम + सल्फर ८०% १०० ग्रॅम.
किंवा
४) पॉलीट्रीन २५० ग्रॅम + नुवान २०० मिली.
किंवा
५) कोराजन ६० मिली.
किंवा
६) अॅबा १०० मिली.
: कीड :
१) मावा व फूलकिडे –
लक्षणे – शेवंतीवर मावा व फूलकिडे या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या किडी पाने व फुलांना उपद्रव करतात, त्यामुळे फुलांची गुणवत्ता बिघडते.
नियंत्रण –
१) त्रिकाल (युनिवर्सल बायोकॉन) – १मिली प्रति लिटर पाणी.
२) पाने गुंडाळणारी कोळी –
लक्षणे – पानाच्या खालच्या बाजूने जाळ्या तयार करुन पाने गुंडाळणारी कोळी कीडही आढळते.
नियंत्रण – पाण्यात विरघळणारे गंधक तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
३) अस्वल अळी –
लक्षणे – अंगावर केस असणार्या अस्वल अळीचा प्रादुर्भाव शेवंतीवर पावसाळ्यात आढळतो. ही कीड पाने खाते व पिकाचे मोठे नुकसान करते.
नियंत्रण – क्विनॉलफॉस – २मिली प्रति लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी.
: रोग :
१) पानांवरील ठिपके –
लक्षणे – हा रोग पावसाळी दमट हवामानात आढळतो. या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीलगतच्या पानांवर होतो. पानांवर काळपट तपकिरी गोलाकार ठिपके पडतात. ते हळूहळू मोठे होतात. परिणामी, संपूर्ण पान करपते. या रोगाचा प्रसार बुंध्याकडून शेंड्याकडे होत जातो. दुर्लक्ष झाल्यास कळ्या व फुलेदेखील या रोगाला बळी पडतात.
नियंत्रण – रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी मॅंकोझेब (एम-४५) – ५००ग्रॅम प्रति २००लिटर पाणी
किंवा
कार्बेंडाझिम (बावीस्टीन) – २५०ग्रॅम अधिक क्लोरोथॅलोनील २५०मिली प्रति २००लिटर पाणी यापैकी बुरशीनाशकांची आलटून पालटून गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
: संजीवक :
शेवंतीची लागवड कशा (रूट सकर्स) पासून करतात. तथापि अलीकडे मोठ्या फुलांच्या जातींची अभिवृद्धी शेंडा कलमाने केली जाते. या कलमांना लवकर व भरपूर मुळे फुटण्यासाठी ०.०१ टक्का आयबीए मिश्रित सिरॅडिक्स अथवा किरॉडिक्स भुकटीत कलमाची बुडे घोळवून घेऊन मग लागवड करावी. तसेच १ हजार पीपीएम तीव्रतेच्या आयबीएच्या द्रावणात कलमांची बुडे बुडवून (२ ते ५ मिनिटे) लागवड केल्यास चांगला परिणाम होतो.
: उत्पादन :
७ ते १३ टन सुटी फुले हेक्टरी
उशिरा काढल्यास रंग फिका पडतो व वजनही कमी भरते. जातीनुसार फुलांची काढणी लागवडीनंतर तीन ते पाच महिन्यांनी सुरु होते. ती पुढे एक महिना चालते. लवकर उमलणार्या जातींचे एकूण चार ते सहा, तर उशिरा उमलणार्या जातींचे आठ ते दहा तोडे होतात. हेक्टरी साधारणत: सात ते १३ टनांपर्यंत सुट्या फुलांचे उत्पादन मिळते. फुलांचे पॅकिंग बांबूच्या करंड्या किंवा पोत्यांत केले जाते. लंबच्या बाजारपेठेसाठी बांबूच्या करंड्यांचा, तर जवळच्या बाजारापेठेसाठी पोत्यांचा उपयोग पॅकिंगसाठी करतात.