झेंडू
झेंडू
: जमीन :
हलकी ते मध्यम जमीन या पिकास पोषक आहे. सकस, भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली असली तरी उत्पादन कमी मिळते
: हवामान :
उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात याची वर्षभर लागवड करता येते. फुलांच्या उत्पादनासाठी मध्यम हवामान लागते. रात्रीचे १५ ते १८ अंश सेल्सिअस तापमान झाडाची वाढ व उत्पादनासाठी पोषक असते. थंड हवामानात हे पीक चांगले येते, दर्जेदार फुलांचे उत्पादन मिळते. जास्त पावसाचा परिणाम पिकाच्या वाढीवर होतो.
: वाणांची नावे :
इंका ऑरेंज , कलकत्ता ,ऑरेंंज गोल्ड, ग़ोल्ड स्पॉट.
: बियाण्याचे प्रमाण :
५०० ग्रँम/हे., संकरित जातीसाठी २०० ग्रँम/हे. किंवा १०००० रोपे प्रति एकरी.
: बीजप्रक्रिया :
लागवडीपूर्वी रोपांची मुळे ३० मिनिटे कॅप्टन ०.२ टक्के प्रमाणातील द्रावणात बुडवून लागवड करावी
: रोपवाटिका :
रोपांसाठी २ मीटर बाय २ मीटर आकाराच्या गादी वाफ्यावर, ओळीत ४ ते ५ सें.मी. अंतर ठेवून, १ सें.मी. खोलीवर बी विरळ पेरावे. पेरणीनंतर बी शेणखत व माती मिश्रणाने झाकून टाकावे. वाफ्याला झारीने पाणी द्यावे. हेक्टरी १ ते १.५ किलो बी लागते.संकरित जातीचे बी महाग असते. त्यामुळे त्याची काळजीपूर्वक पेरणी करावी. रोपे तयार करण्यासाठी प्लॅस्टिक ट्रे व कोकोपिट वापरावे. निर्जंतुक केलेले कोकोपिट ट्रेमध्ये भरुन प्रत्येक पेल्यात एक बी टोकून पाणी द्यावे. या पद्धतीने रोपे तयार केली तर २५० ग्रॅम बी पुरेसे होते.तयार केलेल्या रोपांची पुनर्लागवड करावी. रोपे तयार करण्यास भरपूर मजूर लागतात. हे खर्चिक असले तरी लागवडीसाठी बी कमी लागते.
: लागवडीची पद्धत :
सरी वरंब्या
:आंतरमशागत :
रोप लागवडीनंतर दोन आठवड्यांनी खुरपणी करावी. खुरपणी करताना रोपालाभर द्यावी, त्यामुळे रोपे फुलाच्या ओझ्यांनी कोलमडत नाहीत.
: पेरणीचे अंतर :
पावसाळी हंगाम – उंच जाती – ६० × ६० सें.मी. मध्यम उंचीची – ६० × ४५ सें.मी.
हिवाळी हंगाम – उंच जाती – ६० × ४५ सें.मी. मध्यम उंचीची – ४५ × ३० सें.मी.
उन्हाळी हंगाम – उंच जाती – ४५ × ४५ सें.मी. मध्यम उंचीची – ४५ × ३० सें.मी.
: पेरणीची वेळ :
खरीप व रब्बी, उन्हाळी
: खते :
२५ ते ३० टन शेणखत एकरी १००:१००:१०० नत्र:स्फुरद:पालाश कि/हे.
:ड्रिप खते:
१० वा दिवस – १९:१९:१९ (३ किलो ) + ह्युमिकॉन (५०० ग्रॅम )
२० वा दिवस – १३:४०:१३ (४ किलो) + झिंंक (५०० ग्रॅम)
३० वा दिवस – १३:०:४५ (५ किलो)
४० वा दिवस – ०:५२:३४ (५ किलो) + मॅग्नेशिअम सल्फ़ेट (८ किलो)
५० वा दिवस – १९:१९:१९ (५ किलो)
६० वा दिवस – १३:०:४५ (३ किलो) +कॅल्शिअम नायट्रेट (४ किलो)
७० वा दिवस – ०:०:५० (५ किलो)
७५ वा दिवस -पोटॅशिअम शेओनाईट (८ किलो)
८२ वा दिवस – ०:०:५० (५ किलो) + बोरॉन (५०० ग्रॅम)
९० वा दिवस – १९:०:४५ (५ किलो)
९९वा दिवस – ०:५२:३४ (५ किलो ) + फॉस्फ़रील (१लि.)
: पाण्याचे व्यवस्थापन :
खरीप हंगामात पाऊस नसेल तर १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. रब्बी हंगामात ८ ते १० दिवसांनी, तर उन्हाळी हंगामात ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. फुलांचे उत्पादन चालू झाल्यानंतर फुलांची काढणी पूर्ण होईपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
: कीड :
पानावरील केसाळ अळी व मावा किड
या अळी किडीच्या नियंत्रणासाठी मॅलथिऑन २.५ मिली/लिटर याप्रमाणात दर १० दिवसाच्या अंतराने फवारावे.
: रोग :
मुळ व खोडकुज
या रोग नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा कॅप्टन ०.३% या बुरशीनाशकाचे द्रावण बुंध्याशेजारी ओतावे.
पान व कळ्यावरील करपा रोग
या रोग नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ०.२% २.५ ग्रॅम किंवा कॅबरीओटॉप ३ ग्रॅम किंवा स्कोर ०.५ मिलि,किंवा फोलिक्युअर १ मिलि,किंवा डेल्कॉन २ मिलि
: संजीवक :
झेंडू पिकास फुलकळ्या लागण्याच्या अगोदर २ हजार ते ५ हजार पीपीएम सायकोसिल अथवा लिहोसीन या संजीवकाचे मुळाजवळ ड्रेचिंग (जिरवणी) केल्यास, फुले लवकर व अधिक प्रमाणात लागतात.फुटवा चालु झाल्यवर०:५२:३४ २.५ ग्रॅम अधिक लिहोसिन २ मिलि अधिक गोल्ड माईन ०.५ मिलि प्रति लि फवारणी.
: उत्पादन :
१० ते १५ टन सुटी फुले आफ्रिकन झेंडू – १५ ते १८ टन फ्रेंच झेंडू – १० ते १२ टन
: काढणी :
लागवड केल्यापासून ६० ते ६५ दिवसांत फुले काढणीस तयार होतात. फुले पूर्ण उमलल्यानंतर काढणी करावी. उमललेली फुले देठाजवळ तोडून काढावीत.
काढलेली फुले थंड ठिकाणी ठेवावीत, काढणी शक्यतो संध्याकाळी करावी स्थानिक बाजारपेठेसाठी बांबूच्या करंड्या किंवा पोत्यात बांधून फुले पाठवावीत.