जमिनीची सुपीकता

0

⚱..जमिनीची सुपीकता..⚱

कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर “जमिनीची सुपकता” अत्यंत महत्वाची आहे.

* ज्या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 आहे
* ज्या जमिनीचा EC  0.5 च्या आत आहे
* ज्या जमिनीची सेंद्रिय कर्बाची पातळी 0.8 च्या पुढे आहे
* ज्या जमिनित क्षारांची पातळी योग्य आहे
असे खुप महत्वाचे घटक आहेत.

पिकास आवश्यक असणारे ” मूळ अन्न द्रव्ये – घटक ” 16 + 1 = 17 आहेत. आपल्या सोयी साठी याचे 4 भाग पाडले आहेत.

@1 नैसर्गिक अन्न घटक = 3 ;
1 कार्बन 2 हैड्रोजन 3 प्राणवायु
हे नैसर्गिक उपलब्ध आहेत.

@2 मुख्य अन्न द्रव्ये = 3;
1 नत्र 2 स्फुरद 3 पालाश.
प्रमाण जास्त लागते म्हणून मुख्य अन्न द्रव्ये म्हणतात

@3 दुय्यम अन्न द्रव्ये = 3; 1कैल्शियम 2मैग्नेशियम 3गंधक
मुख्य अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी पुरवावे लागते म्हणून म्हणून याचे नाव दुय्यम अन्न द्रव्ये म्हणतात.

@4 सूक्ष्म अन्न द्रव्ये = 7 + 1 = 8 .
1 फेरस = लोह, 2 झींक = जस्त
3 कॉपर = तांबे , 4 मंगेनिज,
5 मोलाब्द , 6 बोरॉन, 7 निकेल, 8 सिलिकॉन

ही 8 अन्न द्रव्ये , मुख्य आणि दुय्यम अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी किंवा अति सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात म्हणून याना सूक्ष्म अन्न द्रव्ये असे म्हणतात.

1 क्रमांकाचे अन्न द्रव्ये नैसर्गिक रित्या पिकासा मिळतात . त्याची फारशी चिंता करावी लागत नाही. मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्न द्रव्ये या तिन्ही द्रव्य बाबत लक्ष्य द्यावे लागते.

हे बाकि 13 + 1= 14 अन्न द्रव्ये जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात, ते वजा जाता आवश्यक अन्न द्रव्ये पुरवावी लागतात. हे पुरवलेले अन्न घटक जसेच्या तसे म्हणजे दिलेल्या स्वरुपात पिकास “अपटेक्” “शोषण” करता येत नाहीत. म्हणून या स्वरूपास “स्थिर स्वरूप” किंवा Fix Form असे म्हंटले जाते.

ही अन्न द्रव्ये पिकास “अपटेक्” करण्या योग्य स्वरुपात रूपान्तर व्हावे लागते . हे रूपान्तरणाचे कार्य जमिनीतिल जीवाणु करीत असतात. ह्या विविध प्राकारच्या जीवाणुंची ‘संख्या आणि कार्यक्षमता’ ही अत्यंत महत्वाची असते.

या साठी त्याना त्यांचे खाद्य योग्य प्रमाणात पुरवावे लागते. आणि ते म्हणजे ” सेंद्रिय कर्ब ” होय. जमिनित सेंद्रीय कर्बाची पातळी योग्य असावी लागते. जी आपल्या कड़े फारच कमी आहे. सरासरी 0.3 ते 0.5 एवढीच असते. ही पातळी वाढवणे साठी सेंद्रिय कर्ब द्यावा लागतो. सेंद्रिय कर्ब हा सेंद्रिय खतातून उपलब्ध होत असतो.

सेंद्रिय खतामधे सर्वात उत्कृष्ट ख़त म्हणजे ” शेणखत ” होय. एकरी 40 बैल गाड्या म्हणजे 8 ट्राली (चार चाकी ) किंवा 20 ते 25 टन शेणखत द्यावे.
पण आज ” शेणखत ”  एवढ्या प्रमाणात उपलब्ध नसते.

तरी सुद्धा हे पुरवणे आवश्यक आहेच. ” शेणखत ”  नसल्यास किंवा कमी असल्यास पर्याय निवडावेत.
1 – पोल्ट्री ख़त
2- गांडुळ खत
3- लेण्डी ख़त
4 –  अखाद्य पेंड – करंज, एरंड, लिंबोळी पेंड
5 – साखर कारखान्यातून मिळणारे कम्पोष्ट ख़त. (बग्यास्) योग्य प्रमाणात वापरावीत.

🙏🏼टिप. कोणतीही शेंद्रिय खते पूर्णपने कुजल्याशिवाय शेतात वापरु नये.🙏🏼

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »