धने लागवड – सुधारित वाण.

0

धने लागवड – सुधारित वाण.
कृषिविकास

कोथांबीर साठी धने लागवड केंव्हाही करता येत असली तरी धने उत्पादनासाठी रब्बी हंगाम उपयुक्त मानला जातो. धने उत्पादनास जाती परत्वे १२० ते १४५ दिवस लागतात. जेवढी कसदार जमीन आणि शेणखत जास्त तेवढे उत्पादन जास्त मिळते. दोन ओळीत दीड फुट अंतर तर दोन रोपात ६ सेमी अंतरावर पेरणी करावी. पिक दाट वाटल्यास विरळणी करून कोथांबीर विकावी. एकरी सुमारे आठ किलो बियाणे लागते. पेरणी पूर्वी बारा तास धने रबराने किंवा रबरी चप्पल ने रगडून दोन अर्ध गोलाकार भाग करून ते १२ तास कोमट पाण्यात भिजवावे, सावलीत वाळवून पेरावे. पूर्व मशागत करताना एकरी पाच टन शेणखत आणि पाच क्विंटल निंबोळी खत मिसळावे. पेरणी करताना एकरी ३० किलो युरिया १०० किलो सुपर फोस्फेट आणि १५ किलो म्युरेट ऑफ पोटाश आणि २० किलो गंधक पेरावे. ३० दिवसांनी युरियाचा डोस द्यावा. एकूण पाच वेळा पाणी द्यावे लागते फुलोरा अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. तुषार सिंचन केले तर कमी पाण्यात जास्त पिक येते. तुरे करड्या रंगाचे झाल्यावर झाडे विळ्याने कापून घ्यावी. खळ्यावर काठीने हलके झोडून धने मोकळे करावे. एकरी ४ / ५ क्विंटल उत्पादन मिळते. ६५ / टी – ५३६५ / एनपिजे – १६ / व्ही – १ / को – १ / डी – ९४ / जे – २१४ / के – ४५ असे सुधारित बियाण्याचे वाण आहेत.

कृषी विकास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »