कांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी

0

*कांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी.*
######################
Source:
http://krishiunnati.com/Salla?bid=10709&Source=2
######################
कोणतेही पीक दर्जेदार आणि त्याचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर विशेष परिश्रम घ्यावे लागतात. कांदा पिकाला पोसण्याच्या अवस्थेत एखादा बूस्टर डोस दिला तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. अर्थात त्यासाठी पिकाची लागवडी पासून चांगली वाढ आणि आवश्यक खत मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाच्या ७५ व्या दिवशी १९/१९/१९ हे मिश्र विद्राव्य खत प्रति एक लिटर पाण्यात ५ ग्राम या प्रमाणात फवारावे. गरज  भासल्यास मायक्रो न्यूट्रीएंटची एक फवारणी करावी. कांद्याच्या पातीची वाढ खूप लांब / रुंद झाली असेल तर ६० ते ७५ दिवसांच्या दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ संजीवक एक लिटर पाण्यात ६ मिली या प्रमाणात फवारावे. संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या मार्ग दर्शनानुसार किंवा स्वतः:च्या जबाबदारीवर किंवा आधी प्रयोग करून मग सर्व पिकावर करावा. ज्यामुळे कायिक वाढ कमी होऊन कांदा चांगला पोसतो. दुसऱ्या एक पद्धती मध्ये पिकाच्या दहाव्या दिवशी १९/१९/१९ या मिश्र विद्राव्य खताची फवारणी करावी. तसेच २०० लिटर पाण्यात एक किलो कॅल्शियम नायट्रे ट पिकाच्या २५/४०/५० व्या दिवशी फवारावे. अशा प्रकारे पिकाची वाढ नियंत्रित करून पिकाचा दर्जा आणि उत्पादन वाढविता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »