Research Agriculture : संशोधन शेतीच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे

0

Research Agriculture : संशोधन शेतीच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे : सुरजित चौधरी

Research Agriculture Update : हरितक्रांतीमुळे भुकेची समस्या दूर झाली. यासोबत काही संकटेदेखील समोर आली आहेत. ही संकटे दूर करण्यासाठी प्रभावी, पर्यावरणपूरक कार्यक्रम हवा असून, शास्त्रज्ञांची भूमिका त्यात महत्त्वाची आहे.
Jalgaon News : हरितक्रांतीमुळे भुकेची समस्या दूर झाली. यासोबत काही संकटेदेखील समोर आली आहेत. ही संकटे दूर करण्यासाठी प्रभावी, पर्यावरणपूरक कार्यक्रम हवा असून, शास्त्रज्ञांची भूमिका त्यात महत्त्वाची आहे.
शेतीसमोरील संकटे दूर करण्यासंबंधीचे संशोधन बांधावर पोचायला हवे. शास्त्रज्ञांनी फक्त शोधनिबंध किती सादर केले याचा विचार न करता शेतकऱ्यांचा किती फायदा, विकास होत आहे, यावर काम करावे, असे मत माजी केंद्रीय फलोद्यान आयुक्त तथा माजी केंद्रीय सचिव सुरजित चौधरी यांनी जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय फलोद्यान परिषदेत व्यक्त केले.
नवी दिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचा रविवारी (ता. २८) प्रारंभ झाला. येत्या मंगळवारपर्यंत (ता. ३०) ही परिषद सुरू राहणार आहे. परिषदेत देशातील १०० शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत.
उद्‌घाटनाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, राजगुरुनगर (पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. मेजर सिंग, इस्राईल येथील लसूण शास्त्रज्ञ एइर इशेल, इस्राईलचे आंतरराष्ट्रीय सिंचनतज्ज्ञ अॅम्नोन ऑफेन, चाईचे (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »