Pune District Bank : पावणे दोन महिन्यात ७६ टक्के पीक कर्जवितरण

0

Pune District Bank : पावणे दोन महिन्यात ७६ टक्के पीक कर्जवितरण

Kharif Seson : खरीप हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून पीक कर्जवितरण सुरू केले आहे.
Pune Bank News : खरीप हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून पीक कर्जवितरण सुरू केले आहे. यंदा बॅंकेने खरीप हंगामासाठी एक हजार ८९० कोटी रुपये पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
त्यापैकी अडीच महिन्यात जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ९७२ सभासद शेतकऱ्यांना एक हजार ४४६ कोटी ३९ लाख ६९ हजार रुपये म्हणजेच ७६ टक्के पीक कर्जवितरण करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक वितरण शिरूर तालुक्यात झाले आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या सूत्रांनी दिली.
बदलते हवामान, शेतीमालाला कमी दर, अवकाळी पाऊस अशा विविध कारणांमुळे शेतकरी चांगलाच अडचणीत येत आहे. त्यातच खरीप हंगामात त्याला आधार देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
गेल्या वर्षी खरिपासाठी एक हजार ८०१ कोटी ६५ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी एक लाख ६२ हजार ३३४ सभासदांना एक हजार ३०२ कोटी १६ लाख ५९ हजार रुपये म्हणजेच ७२ टक्के वाटप केले होते. जिल्ह्यात बॅंकेच्या जवळपास २९४ शाखांमधून पीककर्जवाटप होते.
जिल्ह्यात बँकेची खातेदार संख्या जवळपास तीन लाख ५ हजार ७९६ पर्यंत आहे. त्यापैकी जवळपास तीन लाख सभासद शेतकरी पीक कर्ज घेतात. तीन लाखापर्यंताच्या कर्जाला शून्य टक्के व्याज दर आहे. येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत हा कर्जपुरवठा सुरू राहील. त्यानंतर रब्बीसाठी कर्ज पुरवठा करण्यात येईल.
या पिकांसाठी दिले जाते कर्ज
तूर, मूग, उडीद, भात, ज्वारी, बाजरी, कपाशी, मका, सूर्यफूल, सोयाबीन, ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची
नवीन ३९१ सभासदांना कर्जवितरण
पुणे जिल्हा बॅंकेचे सुमारे तीन लाखांहून अधिक सभासद शेतकरी आहेत. त्यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. आत्तापर्यंत नव्याने झालेल्या ३९१ सभासद शेतकऱ्यांनी नव्याने पीक कर्ज घेतले आहे. त्यांना सुमारे ३ कोटी ६५ लाख ५३ हजार रुपयांचे पीककर्ज दिले आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »