‘कुसुम’मधील सौरपंपांचा -जिल्हानिहाय कोटा वाढणार
महाऊर्जाच्या कुसुम योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक शेतकरी ऑनलाइन अर्ज दाखल करत आहेत. परिणामी, संकेतस्थळ संथ होऊन अर्ज दाखल होण्यास विलंब होत आहे. इच्छुक सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून दररोज संकेतस्थळाचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांची वाढती मागणी पाहता जिल्हानिहाय कोटा वाढविण्यात येत आहे,” अशी माहिती ‘महाऊर्जा’चे (मेडा) महासंचालक रवींद्र जगताप यांनी दिली.
महाऊर्जाच्या (मेडा) कुसुम योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत २३ हजार ५८४ अर्ज ऑनलाइन दाखल केले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ६०२ अर्ज, तर सर्वांत कमी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यांत प्रत्येकी एकच अर्ज दाखल आहे. या योजनेतून दरवर्षी १ लाख सौरपंप वितरणाचे उद्दिष्ट आहे. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर आहे. सर्वसाधारण गटासाठी ९० टक्के, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ९५ टक्के अनुदान मिळते.
नाशिक १ हजार ७६९ कोल्हापूर १५८
वाशीम ७७३ रत्नागिरी,सिंधुदुर्ग, प्रत्येकी १
वाशीम ७७३ रत्नागिरी,सिंधुदुर्ग, प्रत्येकी १
ठाणे, रायगड
नगर १ हजार ४१९ बुलढाणा ७३५
जळगाव ८९६ सांगली १ हजार ८२०
नंदुरबार १ हजार ३६ पालघर ८
छत्रपती संभाजीनगर ७७९ पुणे २ हजार ६०२
जालना ९१९ सातारा १ हजार३६९
परभणी ७३१ सोलापूर १ हजार ४५०
हिंगोली ९०७ नागपूर ३०
लातूर ८२६ चंद्रपूर २०
नांदेड ९५२ गडचिरोली ५४
बीड ६९६ भंडारा ४२०
धाराशीव ५०० गोंदिया ९४
वर्धा २ अमरावती ६१
अकोला २७२ यवतमाळ १ हजार १४०
नगर १ हजार ४१९ बुलढाणा ७३५
जळगाव ८९६ सांगली १ हजार ८२०
नंदुरबार १ हजार ३६ पालघर ८
छत्रपती संभाजीनगर ७७९ पुणे २ हजार ६०२
जालना ९१९ सातारा १ हजार३६९
परभणी ७३१ सोलापूर १ हजार ४५०
हिंगोली ९०७ नागपूर ३०
लातूर ८२६ चंद्रपूर २०
नांदेड ९५२ गडचिरोली ५४
बीड ६९६ भंडारा ४२०
धाराशीव ५०० गोंदिया ९४
वर्धा २ अमरावती ६१
अकोला २७२ यवतमाळ १ हजार १४०
सौरपंपाची क्षमता, दर, लाभार्थी हिस्सा
पंपाची क्षमता किंमत लाभार्थी हिस्सा अनुसूचित
(अश्वशक्ती) (जीएसटी सह) (सर्वसाधारण) जाती-जमाती
३ एचपी १ लाख १३ हजार ८०३ १९ हजार ३८० ९ हजार ९६०
५ एचपी २ लाख ६९ हजार ७४६ २६ हजार ९७५ १३ हजार ४८८
७.५ एचपी ३ लाख ७४ हजार ४०२ ३७ हजार ४४० १८ हजार ७२०