राज्यात कुठे पडणार पाऊस,आज या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ⛈️

उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे.हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाने रौद्ररुप दाखवले आहे.शनिवारपासून दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पाऊस सुरू आहे .पावसामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून लाल किल्ल्यात देखील पाणी शिरले आहे.४० वर्षानंतर दिल्लीमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे. पण आतापर्यंत राज्यात हवा तसा पाऊस झालेला नाही त्यामुळे सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले आहे.राज्यात पुणे, मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस नाही.राज्याच्या ग्रामीण भागात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेकडो हेक्टर जमीन पेरणीअभावी तशीच पडून आहे.

दरम्यान आज राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशीमसह विदर्भातील अनेक भागांसाठी १२ जुलै ते १६ जुलैसाठी ‘यलो’ अलर्ट जारी हवामान विभागाने जारी केला आहे.कोकणात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देशात काही ठिकाणी हलक्या ते माध्यम सारी बरसतील. पेरणीयोग्य पाऊस झाला असेल तर पेरणी करण्यास हरकत नाही असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. सोयाबीन, ज्वारी, बाजरी व इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाला असेल तर पेरण्या करता येतील.