नाशिक जिल्हा प्रहार संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश निंबाळकर यांची निवड
नाशिक जिल्हा प्रहार संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश निंबाळकर यांची निवड
चांदवड (दशरथ ठोंबरे)– नाशिक जिल्हयातील गोरगरीब, शेतकरी, मजूर, कामगार यांच्या न्याय हक्कांसाठी सदैव झटणारे, शेतकरयाच्या कांदा प्रश्नी सर्वाधिक आंदोलने करून ते तडीस नेत शेतकरी नेते म्हणून परिचित असलेले चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश रमेश निंबाळकर यांची नाशिक जिल्हा प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी निवड करीत निंबाळकर यांच्या कार्याची पावती दिली. ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील असलेले निंबाळकर यांनी बच्चु कडु यांच्या प्रहार पक्षातील उपजिल्हाध्यक्ष पदावर राहुण पक्ष वाढीसह शेतकरयाच्या अनेक प्रश्नावर आंदोलने करून शेतकरी वर्गाला मोठा न्याय मिळवून देण्यास त्यांचा खारीचा वाटा आहे शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांना सतत दिला जाणारा त्रास यामुळे गोरगरीब मजूर, कामगार, शेतकरी यांना शासनाच्या विविध योजनांपासून कायमच वंचित रहावे लागते.
या गोरगरीब नागरिकांना शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्कांच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गणेश निंबाळकर हे नेहमी अग्रेसर असतात .ते प्रहार पक्षात सुरवातीला काम करीत असताना अनेक अडचणी आल्या. त्यावर निंबाळकर यांनी हळूहळू मात करीत गोरगरीब मजूर, कामगार, शेतकरी यांना त्यांच्या हक्काचा शासकीय लाभ मिळवून दिला आहे. यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर बाजार समितीत होणारा अन्याय, कांद्याचे पडलेले दर, गेट पास, वजन काट्यावरील लुट अशा अनेक मुद्यांवर गणेश निंबाळकर यांनी प्रहार संघटने मार्फत लढा देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे मार्गदर्शन, सहकार्य वेळोवेळी मिळत गेल्याने गणेश निंबाळकर यांना सदैव यश मिळत गेले. गेल्या पाच वर्षात गणेश निंबाळकर यांनी जिल्हयातील चांदवड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, देवळा, येवला, नाशिक या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलने, ठिय्या दिला. या आंदोलनातून सर्वसामान्य नागरिक, दिव्यांग बंधू, शेतकरी यांचे कामे मार्गी लागले आहेत.
नागरिक व शेतकरी जनतेने त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना बाजार समीतीच्या संचालक पदी सर्वाधिक मतधिकयाने निवडून दिले तसेच जिल्हयातील प्रहार संघटना मजबुतीकरणासाठी निंबाळकर यांनी ठीकठिकाणी शाखांचे उद्घाटने करून तरुणांना प्रहार संघटनेत आणल्याने संघटनेला बळकटीकरण आले आहे. गणेश निंबाळकर यांचे नेतृत्व, कार्य, चाणाक्षपणा, हुशारी, आणी एकनिष्ठपणा, शेतकरी व गरिबांना न्याय द्यायची धडपड याबाबीची दखल घेत आमदार बच्चू कडू यांनी त्यांची प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली