शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता !
पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६००० रुपये दिले जातात.रक्कम दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील एक महत्त्वाची सरकारी योजना आहे.शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे १३ हप्ते जारी करण्यात आले असून लवकरच १४ वा हप्ता मिळणार आहे. देशातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे ई-केवायसी, आधार कार्ड अपडेट केले नव्हते. त्यामुळे या १४ व्या हप्त्यासाठी वेळ लागला आहे.केंद्र शासन देशभरातील ८.५ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता जारी करणार असून शेतकर्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम २८ जुलै रोजी जमा केली जाणार आहे.योजनेतील हप्ता चुकू नये यासाठी लक्षात ठेवा खालील बाबी….
ई-केवायसी
या योजनेतील बोगसगिरीला आळा घालण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीएम किसान मोबाईल ॲप आणले आहे.या ॲपमध्ये फेस ऑथेन्टिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञाना आधारे शेतकऱ्यांना त्यांचे ई-केवायसी अगदी सहज करता येईल. त्यांना वन टाईम पासवर्ड आणि फिंगरप्रिंटची गरज राहणार नाही.
आधार कार्डशी कर कनेक्ट
या योजनेतील हप्ता चुकू नये यासाठी एनपीसीआय संबंधीत बँक खात्याचे केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ते नसेल तर खात्यात रक्कम येणार नाही. त्यामुळे तुमच्या खात्याची ईकेवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. आधार आणि एनपीसीआयची जोडणी, लिंकिंग करणे आवश्यक आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नवीन खाते उघडा
तुमच्या खात्याला अडचण येत असेल तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत या योजनेचा १४ वा हप्ता जमा होईल.केंद्र सरकारने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नवीन खाते उघडणे सोपे केले आहे. पोस्ट बँक खात्यात आधार आणि एनपीसीआय जोडणे सोपे आहे.
बँक खाते एनपीसीआयशी लिंकिंग तपासा
बँक खाते एनपीसीआयशी लिंकिंग आहे की नाही हे तपासण्यासाठी सोपी पद्धत आहे. सर्वात अगोदर https://resident.uidai.gov.in/bank-mapper या लिंकवर जावे लागेल.येथे तुमचे सर्व तपशील यामध्ये भरा व नवीन बँक खात्याची माहिती द्या.
योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी खालील माहिती दिली आहे …
खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृ वेबसाईटवर जाल. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला राज्य तुमचा जिल्हा त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि गाव हे सर्व गोष्टी निवडायचे आणि गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. खाली सर्व प्रक्रिया फोटोमध्ये दिसत आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या गावाची यादी दिसण्यात चालू होईल.
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी क्लिक करा 👈👈