Maharashtra Rain Update : कोकणात पावसाचा कहर, जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती काय…

0

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. पु़ढचे तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढल्याने वाशिष्टी नदीला पूर आला आहे. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले असून पूरस्थिती चा धोका निर्माण झाला आहे व शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.वाशीम जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल असल्याने, केदार नदी सह उमा नदीला पूर आला आहे.हिंगोली व भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरीमुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात काही गावात ढगफुटी सारखे दृश्य निर्माण झाले आहे तसेच संततदार पावसाच्या हजेरीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे ७६ गावांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतो आहे.रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कल्याण, डोंबिवली परिसरात धुंवाधार पाऊस पडतो आहे .आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असून, ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट,तसेच काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.विदर्भाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात अजून समाधानकारक पाऊस झाला नाही. नाशिक वगळता इतर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे मात्र नाशिकमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून नाशिक जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »