काजीसांगवी विद्यालयातील ओम ठाकरे व कृष्णा आवारे यांना शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती यश

0

काजीसांगवी विद्यालयातील ओम ठाकरे व कृष्णा आवारे यांना शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती यश………..

काजीसांगवी : – (उत्तम आवारे) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या काजीसांगवी येथील कै नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्य व उच्च माध्य विद्यालय काजीसांगवी येथील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
शिष्यवृत्ती साठी विद्यालयातून १५ पैकी २ विद्यार्थी पात्र झाले .त्यात ओम जगदीश ठाकरे व कृष्णा विजय आवारे यांना दोन वर्षासाठी दहावी पर्यंत ७५००/- वार्षिक मिळणार आहे. तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्लभ घटक शिष्यवृत्ती परीक्षा( एन एम एम एस) या परीक्षेत साक्षी रविंद्र तळेकर ह्या विद्यार्थीनीने घवघवीत यश प्राप्त केले.तीला १२ वी पर्यंत दरवर्षी बारा हजार रुपये मिळणार आहे.
ह्या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर चव्हाण , शितल राठोड, भारती पगारे, चिमाजी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सरचिटणीस नितीनभाऊ ठाकरे , चांदवड तालुका संचालक सयाजीराव गायकवाड, सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर तसेच विद्यालयाचे प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर व पर्यवेक्षक सुभाष पाटील यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

   फोटो  - काजीसांगवी विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना उपस्थित सर्व मान्यवर.............

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »