सोनीसांगवी ग्रामस्थानी जि प. शाळेळा ठोकले कुलुप

0


काजीसांगवी(दशरथ ठोंबरे) : चांदवड तालुक्यातील सोनीसांगवी येथील जि. प .शाळेला शिक्षकाची मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थ व पालकांनी शाळेला कुलूप ठोकले
येथील जि प शाळा इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत असून यात एकूण 44 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यासाठी दोन शिक्षक या शाळेवर कार्यरत होते त्यापैकी निंबा आहेर हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे संदीप जाधव या एकच शिक्षकवर चार वर्गाची अध्यापनाची जबाबदारी आली.त्यात विद्यार्थाचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने येथिल सरपंच अलका ठाकरे व व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष विठ्ठल ठाकरे व पदधिकारी व पालक यांनी तातडीने शिक्षक मिळावा म्हणुन गटशिक्षण आधिकारी संदिप कुमार शिंदे यांना शिक्षक मागणीचे निवेदन दिले .पंरतु एक महिना उलटुनही शाळेला शिक्षक मिळाना त्यांतच कार्यरत असलेले संदिप जाधव हेआचानक आजारी झाल्याने त्यांनी मेडीकल रजा टाकली व येथिल शाळा शिक्षक विना झाली. विद्यार्थाचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहुन येथिल शाळेला संतप्त झालेल्या पालक व ग्रामस्थानी दि. 27रोजी सकाळी आकरा वाजे दरम्यान विद्यार्थाना बाहेर बसविले व शाळेच्या दोन्ही खोल्याना कुलुप ठोकले .याबाबत ची माहीती केंद्रप्रमुख गांगुर्डे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन संतप्त पालकाची भुमिका ऐकुण घेत तात्पुर्त्या स्वरुपात एक शिक्षकाची नियुक्त केली परंतु दुसरा शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेचे कुलुप खोलणार नाही या भुमिकेवर पालक व ग्रामस्थ ठाम होते. या वेळी विठ्ठल ठाकरे गौरव ठाकरे राजेंद्र ठाकरे रवींद्र ठाकरे केशव ठाकरे नितीन ठाकरे शरद ठाकरे भाऊराव पवार प्रवीण ठाकरे गोरख घंगाळे सोमनाथ ठाकरे रोहित ठाकरे संजय ठाकरे प्रमोद ठाकरे शिवाजी घंगाळे उपस्तीत होते.

प्रतिक्रिया:-येथिल जि. प. शाळेतील एक शिक्षक एक महिन्यापुर्वी सेवा निवृत्त झाल्याने येथिल शाळा एक शिक्षकीय झाली होती. त्यामुळे विद्यार्थाचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आम्ही गटशिक्षणधिकारी संदीपकुमार शिंदे यांच्याकडे वारवांर शिक्षक मागणी करुनही शिक्षक मिळात नाही त्यात विद्यार्थाचे मोठे नुकसान होत असल्याने .येथिल पालक ग्रामस्थ आक्रमक होऊन शाळेला कुलुप ठोकले विद्यार्थाचे नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर शिक्षकाची नियुक्ति करावी

-अलका ठाकरे (सरपंच सोनीसांगवी)

सोनीसांगवी जि. प. शाळेचे शिक्षक रजेवरुन येईपर्यत तेथे तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकाची नियुक्ती केली आहे
येथील रिक्त पदाचा अहवाल जि. प. ला पाठवण्यात आला आहे .कामस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती ही जिल्हा परिषद मार्फत लवकरच करण्यात येईल तालुक्यातील अनेक शिक्षक पद रिक्त आहे विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी ग्रामस्थानी सहकार्य करावे
-सदीपकुमार शिंदे (गटशिक्षणधिकारी चांदवड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »