कृषी अभियांत्रिकीमध्ये वाढत्या संधी

0

कृषी अभियांत्रिकीमध्ये वाढत्या संधी

Agriculture Engineering Update : विकसित शेतीमध्ये कृषी अभियांत्रिकी पदवीधराला चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रामध्ये विविध यंत्रे, पीक लागवडीपासून ते प्रक्रिया, पॅकिंगपासून ते मार्केटिंगपर्यंतचे सर्व टप्पे सामावले आहेत.

Agriculture Engineering Update : विकसित शेतीमध्ये कृषी अभियांत्रिकी पदवीधराला चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रामध्ये विविध यंत्रे, पीक लागवडीपासून ते प्रक्रिया, पॅकिंगपासून ते मार्केटिंगपर्यंतचे सर्व टप्पे सामावले आहेत.

याचबरोबरीने सौरऊर्जा, पवनऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा, पृथ्वी, जल व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र विकास, पाणी व्यवस्थापन, शेतवस्ती विकास, बायोगॅस, सेंद्रिय शेती, जनावरांचे संगोपन, शेती कुंपण आदी उद्योगामध्ये संधी आहेत.

कृषी अभियांत्रिकी पदवीनंतर आपल्या समोर पदव्युत्तर व आचार्य पदवी शिक्षणाची संधी मिळते. याशिवाय एमबीएसाठी संधी आहे. आयआयटी, आयआयपी, आयआयएमसारख्या ठिकाणी देखील पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन पदव्युत्तर होता येईल

प्रवेशाचे स्वरूप

बारावीनंतर चार वर्षे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याला बी.टेक. कृषी अभियांत्रिकी ही पदवी मिळू शकते. त्यासाठी सर्वसाधारण उमेदवाराला बारावीमध्ये ५० टक्के, तर आरक्षित वर्गासाठी किमान ४० टक्के गुण आवश्यक आहेत.

अभ्यासक्रमाचे स्वरूप

कृषी संलग्न सर्व शाखांमध्ये सर्वांत जास्त म्हणजे १८३ क्रेडिट असणारी ही पदवी आहे. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर तसेच सायन्स आधारित सर्व गोष्टींचे पुरेपूर ज्ञान या पदवी अभ्यासक्रमात आहे.

धन्यवाद

🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »