पर्जन्यमान मोजण्याची उपकरणे: प्रा. एस.ए.हुलगुंडे

0

हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या , तसेच विविध संशोधन संस्था , कृषी महाविद्यालयातील हवामान वेधशाळा यांच्या वतीने विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या पर्जन्यमापकाच्या साह्याने किती पाऊस पडला, याचे मोजमाप केले जाते. मात्र अशा पर्जन्यमापकांची संख्या मर्यादित असल्यामुळे एखाद्या विशिष्ट ठिकाणचे पावसाचे प्रमाण सांगताना अनेक अडचणी येतात. हे टाळण्यासाठी आपल्या गावामध्येच नव्हे, तर आपल्या शेतामध्ये नेमका किती पाऊस पडला, हे आपल्याला अगदी साध्या पद्धतीने वेगवेगळ्या व उपकरणांद्वारे मोजता येते.
सध्या हवामान बदलामुळे पावसाचे संतुलन बिघडताना दिसत आहे बहुतांश ठिकाणी पाऊस कमी अधिक पडत आहे. यावर्षीचा पाऊसमानाचा अभ्यास करता असे लक्षात येते कि पेरणीयोग्य म्हणजेच किमान १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याची शिफारस कृषी विभाग व विद्यापीठातर्फे करण्यात आली होती. त्यामुळे काही ठिकाणी खोळंबलेल्या पेरणी मार्गी लागली, तर काही ठिकाणी ‘झालेल्या अधिक पावसामुळे उगवून वर आलेल्या पिकांचे नुकसान झाले. पण हे पावसाचे प्रमाण बहुतांश शेतकरी अंदाजाने तपासतात. त्याऐवजी आपल्या शेत परिसरामध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अचूक पद्धतीने मोजण्यासाठी पर्जन्यमापक या उपकरणाचा वापर केला जातो. त्याचे एकक मेट्रिक पद्धतीत लिटर किंवा मिलिमीटर प्रति चौरस मीटर असे असते. तर ब्रिटिश पद्धतीत इंच प्रति चौरस फूट हे एकक देखील वापरले जाते. पर्जन्यमापक (रेनगेज) हे जमिनीच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या पावसाच्या विशिष्ट बिंदूवरील व वेळेनुसार पर्जन्यमानाची खोली मोजण्याचे उपकरण आहे.

पर्जन्यमापक उपकरणाचे दोन प्रकार आहेत :

१) नोंदणीविना (नॉन रेकॉर्डिंग) पर्जन्यमापक
    हा पर्जन्यमापक सर्वत्र वापरला जातो. या  पर्जन्यमापक उपकरणामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या पावसाची खोली मोजता येत असली, तर पावसाची वेळ नोंदवली जात नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याची निरीक्षणे २४ तासांच्या शेवटी माणसांद्वारे नोंदवली जातात.
अतिवृष्टीच्या काळात या उपकरणाच्या वापरावर मर्यादा येतात. य पर्जन्यमापकात जमा झालेले पावसाचे पाणी हे कॅनमध्ये जमा होते. ते मार्किंग केलेल्या मोजमात्राने मोजले जाते. हे सायमन पर्जन्यमापक अत्यंत लोकप्रिय असून, पाणलोट क्षेत्रातील पावसाची खोली मोजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. यामध्ये १२.७ सेंटिमीटर चक्राकार व्यासाचे पात्र असून त्यावर तितक्याच व्यासाचे नरसाळे (फनेल) असते. नरसाळे चक्राकार व्यासाचे पात्र असून, त्यावर तितक्याच व्यासाचे नरसाळे (फनेल) असते. नरसाळे चक्राकार व्यासाच्या पात्रावर अशा प्रकारे ठेवले जाते. तेवढ्या व्यासावर पडणारे सर्व पावसाचे पाणी बाटलीमध्ये जमा होईल. हे उपकरण धातूच्या आवरणाने झाकलेले असते. याची उभारणी जमिनीच्या पृष्ठभागापासून ३०.५ सेंटीमीटर उंचीवर उभ्या पद्धतीने दगडी पायावर केली जाते. या उपकरणात पाण्याने बादली पूर्ण भरली असता १.२५ सेंटिमीटर पावसाची खोली मोजली जाते. या उपकरणाद्वारे पावसाची गणना दिलेल्या कालावधीसाठी कॅलिब्रेटेड जारच्या सहाय्याने करतात. त्यावरील नरसाळे हे सहसा आजूबाजूला पडणाऱ्या पावसाचे शिंतोडे त्यात येऊ नयेत, यासाठी उंच स्थानावर धरले जाते. दररोज सकाळी साडे आठ वाजता पावसाचे पाणी मोजले जाते. या उपकरणात पावसाचे प्रमाण मोजले जात असले तरी पावसाची तीव्रता व कालावधी कळू शकत नाही. म्हणजेच पाऊस कधी सुरू झाला आणि थांबला, याची नोंद अचूकपणे होत नाही. हे उपकरण आपल्याला घरच्या घरी तयार करता येते. फारसा खर्च येत नाही. याची उभारणी जमिनीच्या पृष्ठभागापासून ३०.५ सेंटीमीटर उंचीवर उभ्या पद्धतीने दगडी पायावर केली जाते. या उपकरणात पाण्याने बादली पूर्ण भरली असता १.२५ सेंटिमीटर पावसाची खोली मोजली जाते. या उपकरणाद्वारे पावसाची गणना दिलेल्या कालावधीसाठी कॅलिब्रेटेड जारच्या साह्याने करतात. त्यावरील नरसाळे हे सहसा आजूबाजूला पडणाऱ्या पावसाचे शिंतोडे त्यात येऊ नयेत, यासाठी उंच स्थानावर धरले जाते. नियमित दिवशी सकाळी साडे आठ वाजता पावसाचे पाणी मोजले जाते. या उपकरणात पावसाचे प्रमाण मोजले जात असले तरी पावसाची तीव्रता व कालावधी कळू शकत नाही. म्हणजेच पाऊस कधी सुरू झाला आणि थांबला, याची नोंद अचूकपणे होत नाही. हे उपकरण आपल्याला घरच्या घरी तयार करता येते. फारसा खर्च येत नाही.

# नोंदणीविना (नॉन रेकॉडिंग) पर्जन्यमापक वापरताना घ्यावयाची काळजी
१) पावसाचे मापण  करताना पर्जन्यमापकाची उभारणी  मोकळ्या जागेत करावी .
२) पर्जन्यमापकाच्या सर्व बाजू हवामानाच्या संपर्कात असायला हव्यात .
३)  पर्जन्यमापक हा झाडे , उंच इमारती , पाण्याचे पाईप यापासून दूर असावा.
 ४)  नोंद करत असताना कॅन मध्ये साठलेले पाणी मोजपत्रात ओतत असताना पाणी सांडणार नाही याची सर्वतोपरी काळजी घावी .
५)जर अतिवृष्टीच्या काळात कॅनच्या बाहेरील सरंक्षित भागात पाणी साठले असें तर ते पाण्याची पण नोंद करावी.
६) पर्ज्यनामापक नेहमी स्वच्छ ठेवावे.

# नोंदणीविना (नॉन रेकॉडिंग) पर्जन्यमापक वापरण्याचे फायदे
१) वापरण्यासाठी अत्यंत सोपे असे उपकरण.
२) कमी खर्चिक

२) नोंदणी करणारा (रेकॉडिंग) पर्जन्यमापक
        रेकॉर्डिंग प्रकारच्या पर्जन्यमापकाला स्वयंचलित, एकत्रित किंवा स्वयंनोंदक (सेल्फ रेकॉडिंग रेनगेज) असेही म्हणतात. हे स्वयंचलित उपकरण या असून याद्वारे किती पाऊस पडला याच्या नोंदी घेतल्या वर जातात. यातही पावसाचे पाणी भांड्यात जमा केले जाते. या उपकरणाद्वारे पावसाचे प्रमाण आणि त्याच्या कालावधीची नोंद एकाच वेळी होते. रेकॉर्डिंग पर्जन्यमापकाचे तीन प्रकार पडतात.

अ) वजनाधारित पर्जन्यमापक:
          यामध्ये स्प्रिंग किंवा लिव्हर बॅलन्सच्या प्लॅटफॉर्मवर पावसाचे पाणी साठविण्याचे भांडे असते. पावसाचे थेंब नरसाळ्यामार्फत त्यात जमा होतात. वजन मोजण्याची प्रक्रिया मुद्रित यंत्रणेशी जोडलेले असते. या मुद्रित यंत्रणेमध्ये रेनगेज पेन, घड्याळाच्या दिशेने फिरणारा ड्रम आणि रेनगेज चार्ट असतात. जसजसे पावसाचे पाणी त्या बादलीत गोळा होते. पाण्याच्या वजनाने स्प्रिंग दबली ते तसे जाते. त्याच्याशी संलग्न असलेला रेकॉर्डिंग पेन घड्याळाच्या दिशेने फिरणाऱ्या ड्रमवर लावलेल्या आलेखावर पावसाची खोली नोंदवत जातो. त्यामुळे पावसाचे संपूर्ण मोजमाप हे आपल्याला आलेखाच्या स्वरूपात प्राप्त होते.

ब)टिपिंग बकेट रेनगेज:
          या उपकरणामध्ये एक ३०० मि.मी.चे नरसाळे असून, त्यातून पावसाचे पाणी गोळा केले जाते. नरसाळ्याच्या खाली एक बादलीची जोडी निश्चित केलेली असते. या प्रत्येक बादलीची क्षमता पावसाचे पाणी ०.२५ मिलिमीटर जमा करण्याइतकी असते. पावसाच्या पाण्याने पहिली बादली पूर्ण भरताच ती खाली जाते व या पहिल्या बादलीची जागा ही दुसरी बादली घेते. पहिल्या बादलीतील पाणी हे खाली असलेल्या कॅनमध्ये जमा होते. हे ठराविक प्रमाण भरल्यानंतर एक इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे एक स्वयंचलित पेन कार्यरत होतो. आलेख कागदावर पावसाचे प्रमाण नोंदवतो. या उपकरणामुळे २४ तासांत पडलेल्या पावसाचे अचूक प्रमाण मोजता येते. उपकरणामुळे २४ तासांत पडलेल्या पावसाचे अचूक प्रमाण मोजता येते…

क)तरंगणारे पर्जन्यमापक :

             या पर्जन्यमापकाचे कार्य वजनाच्या बादली सारखे असते. नरसाळे आयताकृती तरंगणारा (फ्लोट) टाइप रेनगेज पर्जन्यमापक कंटेनरमध्ये गोळा केलेले पाणी जमा करते. कंटेनरच्या तळाशी एक फ्लोट (तरंगणारा घटक) प्रदान केलेला असतो. कंटेनरमधील पाण्याची पातळी वाढल्यावर हा फ्लोट वाढतो. त्याची हालचाल घड्याळाच्या कामामुळे चालणाऱ्या रेकॉर्डिंग ड्रमवर फिरणाऱ्या पेनने केले जाते.
याशिवाय ऑप्टीकल पर्जन्यमापक अकौस्टिक डिसड्रोमीटर ज्याला हायड्रोफोन्स देखील म्हणतात ही उपकरणे देखील पावसाचे मापन करण्यासाठी वापरले जातात.

प्रा.एस.ए.हुलगुंडे
सहायक प्राध्यापक
कृषी हवामान शास्त्र विभाग
के.के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक-03

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »