चांदवड येथे शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको

0

कांदा निर्यातीवर लावलेले निर्यात शुल्क काढण्यासाठी तसेच कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलन

काजी सांगवी (वार्ताहर भरत मेचकुल): आज चांदवड मुंबई आग्रा हायवे येथे चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने लावलेल्या 40% निर्यात शुल्काच्या विरोधात आज चांदवड तालुक्यातील सर्वपक्षीय नेते शेतकरी पदाधिकारी यांनी रास्ता रोको आंदोलन केले, यावेळी शेतकरी हा तीव्र स्वरूपात आक्रमक झाला होता.

नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड, नांदगाव, येवला, कसमादे, आदी परिसरात तसेच जिल्ह्यात कांदा हे प्रमुख पिक आहे. या जिल्ह्यातील शेतकरी हा उदरनिर्वाह कांद्याच्या व टोमाटो च्या उत्पादनावर करतो.

 अश्या परिस्थितीमध्ये केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात शुल्क तसेच दुसऱ्या देशातून टमाटे आयात केले म्हणजे शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्याय होत आहे.

यावेळी शेतकर्यांनी ‘केंद्र सरकारचा धिक्कार असो..’, ‘सरकार हमसे डरती है.. पुलीस को आगे करती है..’, ‘आमच्या मागण्या मान्य करा.. नाहीतर खुर्च्या खाली करा..’ अशी सरकारविरोधात घोषणाबाजी करत असंख्य शेतकरी कांदा निर्यातवर ४० टक्के निर्यातशुल्क रद्द करावा, यासाठी मुंबई आग्रा महामार्गावर गुरुवार (दि. २४) सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात केली. चार पैसे जास्त येतील अशी अपेक्षा असतानाच, एका रात्रीत केंद्र सरकारने शेतकरीविरोधी धोरण अवलंबून त्यांच्याविरोधात निर्णय घेत कांदा निर्यातवर ४० टक्के निर्यातशुल्क लावून कांदा उत्पादकांचा केंद्र सरकारने विश्वासघात केला असून, शासनाने घेतलेला हा निर्णय तातडीने माघारी घ्यावा, न घेतल्यास केंद्र सरकारला शेतकरी रोषाला सामोरे जावे लागेल तसेच केंद्र सरकार कायम शेतकरी विरोधात निर्णय घेऊन शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचे काम करत असून, निर्यातवरील कराचा निर्णय मागे घ्या, असे आंदोलनकर्ते शेतकरी व विविध राजकीय पक्ष्याचे पदाधिकारी  रास्ता रोको करत घोषणाबाजी करत होते.

  रास्ता रोकोदरम्यान कांदा निर्यातकर ४० टक्केचा निर्णय केंद्र सरकारने रद्द करावा, नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करा, शेतीपिकांना हमीभाव मिळावा, टोमॅटो आयात रद्द करा,केंद्रसरकारने दुष्काळ सदृश पारीस्तीती बघता अदानी अंबानी यांचेकर्ज माफकेले त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ करावे, कांद्यास प्रती कि. क्विंटल ४००० रु हमी भाव मिळावा, केंद्रसरकारने नाफेड ची खरेदी सुरु केल्याचे जाहीर केले परंतु यापूर्वीच्या नाफेडच्या खरेदीवर शेतकर्यांनी संशय व्यक्त केलेला असल्याने नाफेड ची खरेदी प्रत्येक्षात बाजार समिती मन्धे उतरून करण्यात यावी, दुष्काळी परिस्थिती असल्याने मागणीप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करुन देणे, तसेच शेतक-यांची विज बिले आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, मंगरुळ येथील टोलनाक्यावर शेतीमाल विक्रीस आणना-या वाहनांना व स्थानिकांना येतांना जाताना टोल फ्री सवलत द्यावी, राज्य शासनाने जाहीर केलेले रु.३५०/- प्रति क्विंटलचे कांदा अनुदान १०० टक्के रक्कम शेतक- यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी ,मागील वर्षी अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ शेतक-यांना द्यावी.  अशा अनेक मागण्यांचे निवेदन मा. तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक चांदवड पोलीस स्टेशन, मा. सभापती  कृषी उत्पन्न बाजार समिती, चांदवड यांना आंदोलकांनी दिले.

निवेदन देते वेळी मा.आ. शिरीषकुमार कोतवाल, संजय जाधव, नितीन आहेर, कारभारी आहेर, डॉ. सयाजी गायकवाड, विजय जाधव, गणेश निंबाळकर, बंटी ठाकरे, दौलत ठाकरे, पदमाकर ठाकरे, साहेबराव चौहान, शिवाजी कासव, नंदकुमार कोतवाल, पुंडलिक ठाकरे, पुंजाराम ठाकरे आदि. तसेच शेतकरी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठळक मुद्दे:

काल  राज्याचे उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या म्हणजेच आजपासून २४५० प्रती क्विंटल ह्या दराने नाशिक व परंतु आज यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्यापासून लगेच शेतकऱ्यांकडून 2410 रुपये प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी चालू करू सांदवड व नगर या जिल्ह्यांमधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करू असे आश्वासन दिले परंतु आज दिनांक 24 रोजी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सकाळी लिलाव सुरू होईपर्यंत एकही नाफेडचा अधिकारी किंवा खरेदीदार कांदा खरेदीसाठी आला नाही आणि एकही शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद करून रास्ता रोको आंदोलनामध्ये शेतकरी सहभागी झाले. शेतकरी तीव्र स्वरूपामध्ये आक्रमक झाले होते शेतकऱ्यांची नाफेड हे फसवणूक करत असून याचा शेतकऱ्यांना फायदा न होता दलालांना फायदा होतो नाफेड जो माल खरेदी करतो त्यावर सुध्दा शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली

 त्याबद्दल शासनाने लक्ष घालावे माल घेताना शेतकऱ्यांना वेगळा भाव आणि खरेदी वेगळी असे होते असे काही शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या वेळी प्रशासनास  सांगण्यात आले प्रसासनाने या  मध्ये लक्ष घालून असे प्रकार होत असेल तर यांच्यावर कारवाई केली पाहिजे असे मत माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी व्यक्त केले .

तरुण शेतकरी आक्रमक :

यावेळी चांदवड चे तहसीलदार श्री मंदार कुलकर्णी यांनी आश्वासन दिले की आज सायंकाळपर्यंत नाफेडचे अधिकारी या ठिकाणी येऊन आज सर्व प्रक्रिया पूर्ण करून खरे  खरेदी करतील त्यामुळे आपण आंदोलन मागे घ्यावे परंतु तरुण शेतकरी यांनी संबंधित अधिकारी जोपर्यंत या ठिकाणी येऊन सर्व शेतकऱ्यांसमोर लेखी आश्वासन देत नाही संपूर्ण माल हा बाजार समितीमध्ये खरेदी करत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही याप्रसंगी बरेच शेतकरी रस्त्यावर झोपून आंदोलन करत होते.

पोलिसांनी केला बळाचा वापर :

आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी तसेच प्रतिनिधींनी मान्य तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतरही काही शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते गणेश निंबाळकर प्रकाश चव्हाण तसेच तसेच प्रहार संघटनेचे पदाधिकारी सेनेचे तालुकाध्यक्ष विलास भवर आणि असंख्य तरुण शेतकरी हे रस्त्यावर झोपून आंदोलन करत होते जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही प्रसंगी आम्हाला बलिदान द्यावे लागले तरी चालेल असा पवित्र घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाला बळाचा वापर करून संबंधित शेतकऱ्यांना रस्त्यावरून बाजूला काढावे लागले तसेच काही शेतकऱ्यांना अटक करावी लागली नंतर हा रस्ता सुरळीत करून देण्यात आला.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »