पावसासाठी पोषक हवामान, या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा⛈️
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.राज्यात पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ झाली. उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला असताना पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे.
विदर्भापासून दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण छत्तीसगडमध्ये समुद्र सपाटीपासून१.५ किलोमीटर उंचीवर, तामिळनाडूमध्ये समुद्र सपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असणार आहे.
पुणे, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा असून जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.या जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक परिसरात पाऊस झाला असून नाशिकच्या कळवणसह बेज, पिळकोस, भादवणसह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दोन तास सुरू असलेल्या पावसाने शेतासह सखल भागात पाणी साचले होते.
सप्टेंबर महिन्यातील पावसावर शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. या पावसामुळे रब्बी हंगाम चांगला येईल आणि राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे. राज्यात दडी मारलेला पाऊस आता परतू लागला आहे. पुणे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
स्त्रोत : ॲग्रोवन