श्रीराम विद्यालय रायपुर येथे आद्य संस्थापक कर्मवीर गणपत दादा मोरे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न
श्रीराम विद्यालय रायपुर येथे आद्य संस्थापक कर्मवीर गणपत दादा मोरे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न
काजीसांगवीः (उत्तम आवारे) श्रीराम विद्यालय रायपूर येथे संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर गणपत दादा मोरे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. गांगुर्डे आर.के. सर होते. अध्यक्षांच्या हस्ते कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या प्रतिमेचे पुजन करयात आले. शाळेतील उपशिक्षिका श्रीम. गवळी मॅडम यांनी कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या कार्याचा परिचय करून दिला. शेवटी अध्यक्षीय भाषणात सरांनी आद्य संस्थापक कर्मवीर गणपत दादा मोरे यांचा जिवन परिचय करून दिला.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गांगुर्डे आर. के. सर, सर्व शिक्षक , शिक्षीका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन शाळेचे उपशिक्षक श्री. खांगळ सर यांनी केली.