दिघवद विविध कार्यकारी सोसायटी यांच्या वतीने गुणवंत, यशवंत भूमी पुत्रांचा सत्कार

0

दिघवद वार्ताहर (कैलास सोनावणे ):
गुणवंत, यशवंत यांचा सत्कार


दिघवद विविध कार्यकारी सोसायटी यांच्या वतीने दिघवद येथील भूमिपुत्रांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले. त्याबद्दल दिघवद विविध कार्यकारी सोसायटी यांच्यावतीने सर्व गुणवंत व यशवंत यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष नारायण गांगुर्डे हे होते तसेच याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सन्माननीय सभासद व गावातील मान्यवर उपस्थित होते. या सत्काराप्रसंगी दिघवद गावातील भूमिपुत्र प्राध्यापक योगेश अशोक गांगुर्डे यांना उत्तर महाराष्ट्रातील गिरणा गौरव प्रतिष्ठान याचा आदर्श प्राध्यापक पुरस्कार 5 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाला, वृषाली गांगुर्डे हीची मंत्रालय मिनिस्टर क्लार्क म्हणून नियुक्ती झाली, बापू गांगुर्डे याची नाशिक ग्रामीण पोलीस पदी नियुक्ती झाली, अर्जुन गांगुर्डे यांची भारतीय सैन्य दलात नियुक्ती झाली. या सर्वांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक गांगुर्डे म्हणाले हा तर माझा घरातील सत्कार आहे. आपण सर्व माझे मार्गदर्शक, आधारस्तंभ आहे. याप्रसंगी गावातील तरुण यांना प्रेरणा देण्यासाठी अशा यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करणे हा एक मोठा पायंडा सोसायटीने सुरू केला याबद्दल त्यांनी त्यांचे स्वागत केले. काळाची पावले ओळखून ग्रामस्थांनी चालले पाहिजे यासंदर्भात बोलत असताना प्राध्यापक गांगुर्डे म्हणाले एक दाणा टाकून शंभर दाणे उत्पादन करणारी ही शेती व्यवस्था जर डब्बा जात असेल तर येथे संशोधन करणे गरजेचे आहे व त्याला व्यापारी स्वरूप देऊन प्रोडूसर कंपन्या तयार करून आपल्या मालाची विक्री स्वतःच शेतकऱ्यांनी करावी असाही मानस त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. त्याबरोबरच नवीन शैक्षणिक धोरण यामध्ये असणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांना संधी याविषयी त्यांनी भाष्य केले. शिक्षकाची भूमिका ही विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये 1% असते ती म्हणजे मार्गदर्शकाची आणि यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी 99% प्रयत्न करणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. फक्त त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शनाची गरज आहे. सत्काराला उत्तर देताना ऋषली गांगुर्डे यांनी स्वतः केलेले कष्ट आपल्या शब्दात मांडले व गावातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतंत्र वाचनालय तसेच जिम खाण्याची व्यवस्था उभारण्यासंदर्भात विचार मांडले. त्याबरोबरच दिघवद गाव हे फक्त पोलीस किंवा मिलिट्री मॅन यांचे गाव न राहता अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख निर्माण व्हावी असे मत व्यात केले. आई-वडिलांनी मुलांना दिलेले स्वातंत्र्य याचा त्यांनी पुरेपूर वापर करून त्यांच्या विश्वासाला तडा न जाता यश संपादन करावे अशी वृषाली गांगुर्डे या म्हणाल्या. ग्रामस्थांच्या वतीने बोलत असताना प्राध्यापक वैभव मापारी यांनी सोसायटीचे कौतुक केले हा नवीन उपक्रम गावाला एक दिशा देणारा गावातील तरुणांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व प्रेरणा देणारा ठरेल असे उद्गार त्यांनी या ठिकाणी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पगार यांनी केले तसेच कार्यक्रमाप्रसंगी राजाराम मापरी, आनंदा गांगुर्डे, पोपट गांगुर्डे कारभारी गांगुर्डे, पुरुषोत्तम बारगळ, पत्रकार कैलास सोनवणे, रमन गांगुर्डे, अशोक गांगुर्डे, बाळासाहेब रसाळ, दिलीप गांगुर्डे, सिंधुबाई मापारी, किरण गांगुर्डे, किशोर गांगुर्डे, योगेश मापारी, विलास जगताप, गणेश गांगुर्डे, पुंडलिक गांगुर्डे, बंडू देवरे, किशोर मापारी, वसंत कोल्हे, शंकर निखाडे, नरेश भालेकर, उत्तम मापारी, बबन गाडे, दत्तू मापारी, सचिव राजेंद्र सोनवणे, गंगाधर गांगुर्डे, मोतीराम गांगुर्डे, नाना गांगुर्डे, दिलीप मुजाळ, नामदेव गांगुर्डे, किरण मापारी, मंगेश गांगुर्डे, शिवाजी गांगुर्डे, विश्वनाथ गांगुर्डे, लक्ष्मण गांगुर्डे, दत्तू गांगुर्डे, संपत गांगुर्डे तसेच यावेळी आजी-माजी चेअरमन, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »