विटावे येथील महिलेचा शोले सिनेस्टाईल आंदोलन.
विटावे येथील महिलेचा शोले सिनेस्टाईल आंदोलन.
काजी सांगवी:-(उत्तम आवारे): चांदवड तालुक्यातील विटावे येथील महिला भीमाबाई शांताराम अहिरे यांच्या मुलीच्या मृत्युप्रकरणी योग्य चौकशी होत नसल्याने सदर महिलेने गावातील पाण्याचे टाकीवर चढून शोलेटाईल आंदोलन केले . याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की विटावे येथील भीमाबाई अहिरे यांच्या मुलीने एक महिन्यापूर्वी गावातच फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला .परंतु सदरच्या घटनेवरुन हि आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय भिमाबाई अहिरे यांनी व्यक्त केला .परतु या न्यायासाठी वारंवार चांदवड पोलीस स्टेशन जाऊनही तक्रार घेत नसल्याचा प्रकार घडत होता.
अखेर संतप्त झालेल्या महिलेने आज दि. 25सकाळी आठ वाजता गावातील शिवाजी चौका जवळील पाण्याच्या टाकी वरती चढवून शोलेस्टाईल आंदोलन केले. जोपर्यत न्याय मिळत नाही तो परत खाली उतरणार नाही अशा पवित्र घेतला हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने पोलीस पाटील रमेश ठाकरे यांना कळवले पोलीस पाटील रमेश ठाकरे यांनी ही बाब चांदवड पोलीस स्टेशनला कळवण्यात आली चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ घटनास्थळी हजर होऊन सदर महिलेची समजूत काढून योग्य न्याय मिळाल्या जाईल अशा आश्वासन देऊन त्यांना खाली उतरवले पुढील. यावेळी गावातील ग्रामस्थानी मोठी गर्दी केली.